ज्ञानगंगा विश्वविद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी ध्वजारोहन व देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
१८ ऑगस्ट २०२२

शिरूर


शिरूर शहरातील बाबुरावनगर येथे असणाऱ्या ज्ञानगंगा विश्वविद्यालय ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त, स्वातंत्र्यदिनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ राजेराम घावटे व प्रमुख पाहुणे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अभिजित पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाजपचे जेष्ठ नेते ऍड धर्मेंद्र खांडरे, शिरूर लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ सुभाष गवारी, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ संदीप कोकरे, करारो इंडिया कंपनीचे एच आर मॅनेजर सुनील मुसमाडे, उद्योजक व माजी सैनिक बाळासाहेब शेवाळे, मा कॅप्टन विठ्ठल वराळ, पोलीस उप निरीक्षक सागर कदम, महेश कटारिया तसेच संस्थेचे संचालक, पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी शाळेतील वीद्यार्थ्यांनी परेड, कवायत, योगा, कराटे, देशभक्तीपर गीते, भाषणे व दर्जेदार देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची वाहवाह मिळविली.


भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अभिजीत पठारे यांनी स्पर्धा परिक्षेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत, प्रशासकिय सेवेबद्दलची माहिती दिली. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “शिरूर सारख्या ग्रामीण भागातील व सामान्यातील सामान्य विद्यार्थी आपली जिद्द, चिकाटी, स्वःकष्ट व आत्मविश्वासाच्या जोरावर IAS / IPS सारख्या मोठ्या अधिकारी पदावर पोचू शकतो. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करा, यश नक्की मिळेल” असे प्रोत्साहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले. भाजपचे जेष्ठ पदाधिकारी ऍड धर्मेंद्र खांडरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “मुले ही देशाची मोठी संपत्ती असून, तिचा योग्य व प्रामाणिक उपयोग करून घेतल्यास, देशाचा विकास घडू शकतो, तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर, सातत्याने व आत्मविश्वासाने अभ्यास केल्यास, ते कोणतेही यश सहज संपादित करू शकतात.” असे प्रोत्साहनपर मत व्यक्त केले.

संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ राजेराम घावटे यांनीही आपल्या मनोगतात देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वांना शुभसंदेश दिला. यावेळी त्यांनी शिरूर हवेलीचे माजी आमदार कै. बाबुराव पाचर्णे यांच्या आठवणींना उजाळा देत, ते हयात नसल्याबाबत त्यांची कमतरता जाणवत असल्याची खंत व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान माजी आमदार कै बाबुराव पाचर्णे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सीईओ प्रा डॉ नितीन घावटे यांनी केले. प्राचार्य संतोष येवले यांनी सर्वांचे स्वागत केले. सुत्रसंचालन रावसाहेब चक्रे व जयश्री खणसे यांनी केले. तर आभार प्रा योगेश माने यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *