अनिल देशमुखांच्या जामिनाला १० दिवसांची स्थगिती

१२ डिसेंबर २०२२


राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपावर आज मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. पण अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने आक्रमक भूमिका मांडली. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. त्यासाठी अनिल देशमुख यांच्या जामिनावर १० दिवसांची स्थगिती दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावलर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. तेरा महिन्यांनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे, मात्र सध्या अनिल देशमुखांच्या जामिनाला १० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे १० दिवस देशमुखांचा मुक्काम तुरुंंगातच असणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *