“अविनाशी, निर्भयता,संपन्नता,ही परमेश्वराची वैशिष्ट्ये “

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२१ जुलै २०२२


बुधवार दिनांक २० जुलै २०२२ रोजी राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक  मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी, भोसरी येथे  कीर्तन महोत्सवात भोसरीचे प्रथम आमदार मा. श्री विलास विठोबा लांडे यांचे आई- वडील ह भ प स्व.विठोबा सोनबा लांडे व स्व. इंदुबाई विठोबा लांडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात  सातव्या दिवसाची सेवा हभप जयवंत महाराज बोधले यांनी समर्पित केली . या कीर्तन महोत्सवात श्री विलास लांडे यांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सुवर्ण मंदिर, श्री क्षेत्र भंडारा डोंगर जीर्णोद्धार साठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अनुक्रमे डॉ विजय नखाते व  सावंत साहेब यांनी एक लाखांची देणगी जाहीर केली .

आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करताना हभप जयवंत महाराज बोधले यांनी “संत तुकाराम महाराजांचा वैष्णवांची वैशिष्ट्ये” सांगणा-या अभंगांचे निरूपण केले. अविनाशी, निर्भयता ,संपन्नता ही परमेश्वराची वैशिष्ट्ये भक्तांला मिळतात. तसेच वारकरी संप्रदायातील भोसरीकर स्व.विठोबा लांडे माऊलींचा अधिकार मोठा होता.  लांडे घराण्याचे आणि वारकरी संप्रदायाचे जिव्हाळ्याचे नाते आहे. महाराज पुढे म्हणाले, पित्याचे जे जे आहे ते पुत्राकडे येते तसेच जन्माला येणारा प्रत्येक जण एक दिवस मरतो मृत्यू कायम आपल्या बरोबर असतो.मृत्यू माणसांचा मित्र आहे. विष्णुदास नाश पावत नाही.  विष्णुदासाने मृत्यूवर विजय मिळविला. विष्णुदासाकडे भाव असतो.आपल्या बोलण्याने श्रोत्यांना प्रभुभावित करतो तो खरा वक्ता होय.

कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी  ह.भ.प .पुरुषोत्तम महाराजांनी विशेष योगदान दिले . मा. श्री विलास लांडे ,सौ मोहिनी ताई लांडे ,मा.श्री विश्वनाथ लांडे सौ. संगीताताई लांडे , सौ हिराबाई विठ्ठल मुंगसे , सौ.मिराबाई हिरामण गोडसे, सौ.मिराबाई मारुती गुजर, श्री विक्रांत लांडे,सौ.शुभांगी लांडे, श्री विराज लांडे,सौ.कांचन लांडे ,सौ. विनया सुधीर मुंगसे,सौ विशाखा आदित्य शिंदे हे लांडे परिवारातील सदस्य उपस्थित होते .

संस्थेचे सचिव मा श्री सुधीर मुंगसे खजिनदार व विद्यमान नगरसेवक मा श्री अजितभाऊ गव्हाणे, विश्वस्त श्री विश्वनाथ कोरडे,विश्वस्त व विद्यमान नगरसेवक पिं .चिं .मनपा मा.श्री  विक्रांत लांडे ,आमदार आणा बणसोडे श्री गणेश शिंदे , सर्व विश्वस्त मंडळ  हभप परमपूज्य सद्गुरू दादा महाराज,हभप बाळासाहेब काशीद महाराज, माणिकराव जैद, प्राचार्य.उपप्राचार्य , विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक साकोरे यांनी केले तर श्री गणेश शिंदे  यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *