शिंदेवाडीत सफाई कर्मचाऱ्यांच्या तसेच जवानांच्या वडिलांच्या हस्ते ध्वजारोहण

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१६ ऑगस्ट २०२२

आळेफाटा


शिंदेवाडी (ता.जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीततील सर्व अंगणवाडी (शिंदेवाडी गावठान, व्हरुंडी, उक्ता वस्ती, कापुरवाडी ), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (शिंदेवाडी गावठान, व्हरुंडी) तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी जेष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

ग्रामपंचायत कार्यालय सरपंच समवेत सफाई कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रात मेजर संदीप शिंदे यांचे पिता व सफाई कर्मचारी शुभांगी क्षीरसागर, उक्ता वस्ती अंगणवाडी येथे मेजर तान्हाजी शिंदे यांचे वडील, कापुरवाडी अंगणवाडी मेजर निकम यांचे वडील, जिल्हा परिषद व अंगणवाडी गावठाण शाळा शहीद जवान शशिकांत शिंदे यांचे वडील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी जि. प. व अंगाणवाडी तील बालचमुनी राष्ट्रीय गीते, सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्ठ रीत्या सादर केले. तसेच ग्रामपंचायतच्या वतीने ७५ अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून उपस्थित जेष्ठ नागरिकांचा (वय ७५ व त्यापुढील) शाल -श्रीफळ देऊन सन्मान केला करण्यात आला.

शिंदेवाडी गांवतील एकूण ६ (सहा) विविध दूध – उत्पादक शेतकरी संकलन केंद्राना प्रोत्साहनपर ट्रॉफी देऊन शेतकरी -केंद्राना सन्मानित करण्यात आले.तसेच शालेय परीक्षा व इतर परीक्षा मध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गुणगौरव करण्यात आला असल्याची माहिती गावचे सरपंच एम.डी.पाटील शिंदे यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *