प्रहार दिव्यांग बांधवांकडून शिरूर मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
१६ ऑगस्ट २०२२

शिरूर


भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत असतानाच, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार पतसंस्था यांनीही विविध उपक्रम राबविले आहेत. १५ ऑगस्ट २०२२ रोजी शिरूर शहरातून दिव्यांग बांधवांनी, शिरूर शहराध्यक्ष मनेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढत देशभक्तीपर घोषणा देत, आपले देशाप्रतिचे प्रेम व्यक्त केले. त्यानंतर आंबेडकर उद्यानाजवळील प्रहारच्या जनसंपर्क कार्यालयात मुख्य कार्यक्रम झाला. यावेळी दिव्यांग बंधू भगिनी व लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले. कार्यक्रमातील सहभागी व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच दिव्यांगांच्या पहिल्याच पतसंस्थेची वाटचाल उत्तम गतीने सुरू असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. तसेच ज्या दिव्यांग बांधवांनी या पातसंस्थेतून कर्ज घेऊन ते वेळेत भरले, अशा होतकरू दिव्यांग बांधवांचा प्रहारचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी सातव यांनी या कर्ज परतफेड करणाऱ्या बांधवांबद्दल गौरवोद्गार काढत, सर्व बांधवांनी त्यांचा आदर्श घेत आपलेही कर्ज वेळेत फेडण्याचे आवाहन करत, नव्यानेच सुरू केलेल्या या दिव्यांग बांधवांच्या पतसंस्थेच्या योग्य वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी नवीन सहा कर्जदारांना एकूण चार लाख रु. रक्कमेचे धनादेश वाटप करण्यात आलेत. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, पुणे जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबाळकर, प्रहार पतसंस्थेचे संस्थापक तुषार हिरवे, चेअरमन प्रवीण बेंद्रे, व्हाईस चेअरमन अलीया तिरंदाज, सचिव मनेश सोनवणे, तालुका उपाध्यक्ष कुंडलिक वायकुळे, तालुका उपाध्यक्ष व पतसंस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय तरटे, महिला अध्यक्षा नयना परदेशी, शिरूर प्रहार सचिव गणेश कचरे, संपर्क प्रमुख फरझाना, शिला लाड, रेणुका मल्लाव, दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, सामाजिक कार्यकर्त्या नम्रता गवारे, ज्योती हिवरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिरूर शहर प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले असल्याची माहिती शहराध्यक्ष मनेश सोनवणे यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *