स्वातंत्र्यदिनी अमृतमहोत्सवानिमित्त निमगावसावात वृक्ष लागवड व रक्तदान शिबिर

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१६ ऑगस्ट २०२२

बेल्हे


श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे-पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत १४ ऑगस्ट रोजी महाविद्यालयातील ६० विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. तसेच रक्तदान शिबिर समयी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी महत्वपूर्ण जबाबदारी निभावली.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी भारतीय सेनेतील फौजी अक्षय संजय गाडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे गायन केले. या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निमगाव सावाचे आराध्य दैवत श्री खंडोबा मंदिर जवळील डोंगरावर १५० वड आणि पिंपळ या वृक्षांची लागवड केली. आणि भविष्यातील अनेक पिढ्यांना शुद्ध ऑक्सिजन पुरवण्याची जबाबदारी स्वीकारून पर्यावरण पूरक कार्य केले. तसेच वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली. वृक्षारोपणाचा हा उपक्रम संस्थेचे संस्थापक पांडुरंग पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.

 

सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष उपलब्ध करून दिल्याने त्यांचे आभार मानण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, संस्थेचे खजीनदार व निमगाव सावा चे सरपंच किशोर घोडे, संचालक व छावा प्रतिष्ठानचे संस्थापक संदीप भाऊ थोरात, संतोष गाडगे, माजी उपसरपंच गोविंद गाडगे, सामाजिक कार्यकर्ते योगेश गाडगे, श्रीमंत अनिल गाडगे, भारतीय सैन्य दलातील फौजी सागर घोडे, सचिन भाईक, अक्षय गाडगे, किरण काटे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. छाया जाधव, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, रासेयो स्वयंसेवक, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील ११० मुला-मुलींनी सहभाग घेतला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *