गुंजाळवाडी जिल्हा परिषद शाळेत माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१६ ऑगस्ट २०२२

बेल्हे


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजाळवाडी (बेल्हे) येथे भारत देशाचा ७५ वा अमृत महोत्सव सोहळा आगळ्या वेगळ्या पद्धतीने संपन्न झाला. शालेय ध्वजाचे ध्वजारोहन आर्मी तून नुकतेचे रिटायर्ड झालेल्या देशसेवक विकास अंबादास गुंजाळ व मारुती उमाजी बोरचटे या वीर जवानांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त गुंजाळवाडी (बेल्हे) शाळेला ग्रामस्थांकडून शालेय उपयोगी साहित्य भेट

या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत गावातील ७५ वर्ष पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांचा सन्मान झाला. तसेच सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान झाला, त्याचबरोबर शाळेसाठी वस्तू रुपाने मदत करणाऱ्या सर्वच दानशूर देणगीदात्यांचा यथोचित सन्मान केला. तसेच अमृत महोत्सवानिमिता केंद्र पातळी व बीट पातळीवर विविध स्पर्धात शाळेच्या ज्या विद्याथ्र्यांनी चमकदार कामगिरी केली त्याही गुणवंतांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान झाला. तसेच गावातील १० वी शालांत परीक्षेमध्ये ९३.४० % गुण संपादन करणाऱ्या हायस्कूलच्या सायली संदिप गुंजाळ हिचा देखील या वेळी सन्मान झाला. शाळेची गुणवत्ता पाहून, गरज लक्षात घेऊन लोकसहभागातून ग्रामस्थांनी शाळेस अनेक वस्तू या सुवर्णदिनी सप्रेम भेट दिल्या.


कै. काशिनाथ देवराम गुंजाळ यांचे स्मरणार्थ सखाराम काशिनाथ गुंजाळ यांजकडून संगणक संच, ज्ञानेश्वर पांडुरंग बोरचटे यांजकडून स्पीकर संच भेट, बारकू बळवंत बोरचटे यांजकडून प्रिंटर भेट, ज्ञानेश्वर गुंजाळ व बंधू दत्तात्रय गुंजाळ तसेच बाळशिराम महाराज वाळुंज व बंधू यांजकडून काचेचे कपाट भेट, रामदास गंगाधर गुंजाळ, संतोष आंबटकर, डॉ.नढे व निलेश बाबुराव गुंजाळ यांजकडून शैक्षणिक साहित्य,दक्षता व SMC कमिटी कडून रोख रक्कम सोळा हजार रुपये, शालेय रंगकाम व परिसर सुशोभिकरण,खाऊ वाटप यांसाठी ग्रामस्थ गुंजाळवाडी यांनी १ लाख रुपयांची मदत केली.


याप्रसंगी शालेय विदयार्थ्यानी आपल्या इंग्रजी व मराठीतील भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली. शाळेची इ.१ली ची विदयार्थीनी अक्षदा सुरेश बोरचटे हिचे शाळेत झालेले आजचे भाषण हे जुन्नर नगर वाचनालय जुन्नर व स्वराज्य मित्र मंडळ यांचे विद्यमाने स्वातंञदिनानिमित्त जुन्नर येथे पार पडलेल्या भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धत तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. तिने नंबर पटकावल्याबद्दल ग्रामस्थांनी अक्षदाचे तोंडभरून कौतुक केले. सी.ए विकास गुंजाळ यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. या प्रसंगी ग्रामसेविका लोंढे, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, सतिश बोरचटे व सदस्य,मुख्याध्यापक खामकर,शिक्षक खोदडे सर, पालक, ग्रामस्थ, शिक्षण प्रेमी मोठया प्रमाणात उपस्थित होते. त्यामुळे अतिशय बहारदार कार्यक्रम साजरा झाला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *