श्रावणात प्राधिकरणात भक्तीगीतांच्या स्वरसरी बरसल्या….

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१२ ऑगस्ट २०२२

निगडी


श्री गजानन महाराज मंदिर प्राधिकरण,सेक्टर २७ येथील विश्वस्त रामभाऊ पिसे यांनी आयोजित केलेल्या “श्रावणसरी” या हिंदी व मराठी मैफिलीचे कार्यक्रमात डॉ.अनघा राजवाडे यांनी गायलेल्या भक्तीगीतांना भाविकांनी भरभरून दाद दिली.

हा मराठी हिंदी मैफिलीचा कार्यक्रम जसजसा कार्यक्रम पुढे जात होता तसतसे एक एक सुरात मैफिल रंगत होती. एकामागून एक गाण्याची फर्माईश येत होती त्यात एकसुर निरागस हो, मागे उभा मंगेश, रखुमाई रखुमाई, शिर्डीवाले साईबाबा, निघालो घेऊन दत्ताची पालखी, तोरा मन दरपन केहेलाये, बाजे रे मुरली या बाजे, एक राधा एक मीरा, स्वामी समर्थ माझी आई, गाडी घुंगराची आली, गण गण गणात बोते, मोहे पनघट पे नंदलाल, आई भवानी तुझ्या कृपेने, नाव स्वामींचे, किती सांगू मी सांगू कुणाला अशा सुमधुर भक्ती गीतांच्या प्रभावी सादरीकरणाने वातावरण भक्तीमय झाले.

शेवटी ‘ए मेरे वतन के लोगो” या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाचे निवेदन स्वाती मोडक यांनी केले. तर रामभाऊ पिसे यांनी उत्कृष्ट संयोजन व सर्वांचे आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *