NMMS स्कॉलरशिप परीक्षेत सरदार पटेल आणे हायस्कूलचे १० विद्यार्थी उत्तीर्ण

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१२ ऑगस्ट २०२२

बेल्हे


सरदार पटेल हायस्कूल आणे (ता.जुन्नर) मधील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये झालेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील १४ विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता झिंजाड यांनी दिली.


भोसले ऋग्वेद गोविंद,दाते यश विजय, माने सार्थक संदिप, दाते आदित्य बाळसाहेब, आहेर इशा पोपट, दाते समिक्षा संतोष, आहेर समृद्धी संतोष, दाते पूजा नानाभाऊ, शिंदे अपेक्षा नवनाथ, दाते ईश्वरी भीमा हे दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना विद्यालयातील गणित विषयाचे अध्यापक व माजी प्रभारी मुख्याध्यापक धोंडिभाऊ शिंदे, तसेच तुषार आहेर व विभागप्रमुख भणगे, अरुण बर्डे यांनी मार्गदर्शन केले.


याप्रसंगी पेमदरा गावचे उपसरपंच बाळासाहेब दाते यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व यापुढील काळात १०० टक्के निकाल लागावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी मुक्ताजी दाते, पाटीलबा गाडेकर, जयश्री गाडेकर, शुभांगी भोसले,अमोल दाते आदी ग्रामस्थ उपस्थित होते तसेच विद्यालयातील गणित विषयाचे शिक्षक तुषार आहेर व शाकीर इनामदार यांनी विद्यार्थ्यांचे ट्रायमॅक्स पेन देवून कौतुक केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *