…..आणि उलगडला किशोर कुमार यांच्या संगीतमय गायन प्रवास

संगीता तरडे
विभागीय संपादिका
०५ ऑगस्ट २०२२

पुणे


तुडुंब भरलेले बालगंधर्व रंगमंदिर, मान्यवरांची मांदियाळी किशोर कुमार यांना गाऊन अजरामर केलेली हिंदी गाणी आणि त्याला तितक्याच तोलामोलाची साथ देणारा वाद्यवृंद या संगीतमय वातावरणात पुणेकर रसिकांची सायंकाळ आज सुमधुर आणि काहीशी स्मृती रंजनात गेली निमित्त होते हिंदीसह विविध भाषांमध्ये हजारो गाणे गाऊन ती गाणी आणि तो आवाज अजरामर करणारे किशोर कुमार यांच्या 94 व्या वाढदिवसाचे आणि त्या निमित्त प्रतिकिशोर,महाराष्ट्रातील नामवंत गायक आणि व्हॉईस ऑफ किशोर कुमार म्हणून प्रसिद्ध असणारे जितेंद्र भुरूक यांच्या सत्कराचे.

संवाद, पुणे आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीतर्फेे ज्येष्ठ पार्श्वगायक किशोर कुमार यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत गायक आणि व्हॉईस ऑफ किशोर कुमार म्हणून प्रसिद्ध असणारे जितेंद्र भुरूक यांचा डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी.डी. पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि पुणेरी पगडी देऊन गौरविण्यात आले. सत्कार सोहळ्यानंतर जितेंद्र भुरुक यांनी किशोर कुमार यांच्या सुमधूर गीतांचा कार्यक्रम सहवादक सादर केला.

यावेळी व्यासपीठावर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी.डी. पाटील, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे अध्य़क्ष सचिन ईटकर, संवाद संस्थेचे सुनील महाजन, राष्ट्रपतींच्या हस्ते वीरचक्र प्राप्त कर्नल ललित राय,महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे, युवराज शहा, प्रशांत पवार, बांधकाम व्यवसाईक कल्याण तावरे, प्रसिद्ध कवी अरुण शेवते,

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी.डी. पाटील म्हणाले, किशोर कुमार यांच्या आवाजात जादू होती. किशोर कुमार आणि राजेश खन्ना यांनी त्याकाळीतील महाविद्यालयीन युवकांच्या ह्दयाचा वेध घेतला होता. किशोर कुमार यांच्या गायनाने आमची पिढी भारावून गेली होती आणि आज ही किशोर कुमार यांचे गाणे ऐकल्यावर तीच स्थिती होते. गायक जितेंद्र भुरुक यांनी किशोरजी यांच्या आवाजाची तीच लकब उचलून किशोरजींच्या आवाजाचा पुनर्प्रत्ययाचा अनुभव दिला आहे.

कर्नल ललित राय म्हणाले, भारताच्या सिमा भागांमध्ये शत्रू आणि प्रतिकुल निसर्गाशी दोन हात करतांना किशोर कुमार यांचे रेडिओवर येणारे गाणे हाच आमचा मोठा आधार असतो. किशोर कुमार यांचे गाणे एेकुण शत्रूशी लढण्याची हिंमत वाढते आणि प्रेरणा मिळते. जितेंद्र भुरुक यांनी पुरस्काराला उत्तर म्हणुन थोडक्यात मनोगत व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे अध्य़क्ष सचिन ईटकर यांनी प्रास्ताविक केले तर संवाद संस्थेचे सुनील महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले. धनश्री हेबळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पुणे आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीतर्फेे ज्येष्ठ पार्श्वगायक किशोर कुमार यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत गायक आणि व्हॉईस ऑफ किशोर कुमार म्हणून प्रसिद्ध असणारे जितेंद्र भुरूक यांचा डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी.डी. पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि पुणेरी पगडी देऊन गौरविण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *