जागतिक योग दिनानिमित्त भा.ज.पा. आणि गिरीश खत्री मित्र परिवारच्या वतीने योग व सामुहिक सूर्यनमस्कार शिबिर..

लक्ष्मण दातखिळे – प्रतिनिधी
पुणे, दि. २१ जून २०२१

              भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. आताच्या घडीला संपूर्ण जगावर करोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शक्य असलेल्या प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा. आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता.

संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत.

         यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. ७ व्या जागतिक योगदिनाचे औचित्य साधत भा.ज.पा. आणि गिरीश खत्री मित्र परिवारच्या वतीने दोन ठिकाणी मधुसंचे हॉल व क्षिप्रा सहवास सोसायटी हॉल या ठिकाणी योग व सामुहिक सूर्यनमस्कार शिबिर आयोजीत करण्यात आले होते.

         या प्रसंगी आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता योगगुरू सत्यम दातार, योगगुरू अंकुश भरम, सूर्योदय ग्रुप योग प्रशिक्षक कु. जाई नंदकुमार कवठणकर यांनी योग आणि सूर्यनमस्कार यांचे प्रशिक्षण दिले. जागतिक योग दिनानिमित्त योगगुरूंचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला नगरसेवक जयंत भावे, पुणे शहर खजिनदार भाजपा विनायक अंबेकर, राजेंद्र येडे, निलेश गरूडकर, ऍड. प्राची ताई बगाटे, बिपिन भोगले, आप्पा कुलकर्णी, विनय पाटील, सौरभ अथनिकर, शंतनु खिलारे, चैतन्य वैद्य, संचित नेणे, अमेय फडके उपस्थिती होते. उपस्थित सर्वांचे गिरीश खत्री यांनी आभार मानले.

Advertise

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *