शिवसेनेचे माजी नगरसेवक जेष्ठ उद्योजक मधूकरशेठ बाबर यांचे हृदस्यविकारने निधन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
चिंचवड- दि २४ जुलै २०२२

शिवसेनेचा बुलंद आवाज माजी नगरसेवक , पिंपरी चिंचवड शिवसेनेचे सल्लागार, जेष्ठ उद्योजक मधूकरशेठ बाबर यांचे आज रविवार दि २४ जुलै रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवार आज ४ वाजता निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मावळचे दिवंगत खासदार गजानन बाबर आणि उद्योजक प्रकाशशेठ यांचे ते बंधू होते. शिवसेनेचे माजी शहर प्रमुख योगेश बाबर यांचे ते वडील. त्यांच्या मागे दोन मुली, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

मधूकरशेठ हे नेहमीच तरुणांना उद्योगात यशस्वी होण्यासाठी मदतीचा हात देत असे. मराठी माणसाने उद्योगात यावे आणि मेहनतीने पुढे जावे असे नेहमीच सांगत असे. युवा उद्योजक अमित गोरखे, विजय ढगे यासारख्या अनेक युवकांना त्यांनी नेहमीच मार्गदर्शन केले.

काळभोर नगर येथील राष्ट्रतेज तरुण मंडळ, तसेच गजानन लोकसेवा बँक, जिजामाता पतसंस्था, तसेच अभिनव प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम आणि जनसेवा केली यामुळे नेहमीच तेथील जनतेच्या स्मरणात राहतील. अशा या नेत्यास पिंपरी चिंचवड च्या जनतेच्यावतीने तसेच आपला आवाज न्यूज नेटवर्क आज आपली सखीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *