रशियातून,ह्रदयरोगतज्ञ झालेल्या डॉ स्नेहा पारधी यांचा विविध संस्था संघटनांकडून सन्मान

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१३ जुलै २०२२

आंबेगाव


पुणे जिल्ह्यातील, आंबेगाव तालुक्यातील मूळच्या रहिवाशी असलेल्या डॉ. स्नेहा पारधी यांनी नुकतेच आपले सहा वर्षाचे वैद्यकीय शिक्षण रशियात पूर्ण करून MD डॉक्टरेट (हृदय तज्ञ) ही पदवी प्राप्त केली आहे. व त्या नुकत्याच भारतात आल्या आहेत.

आदिवासी ठाकर समाजातुन,अत्यंत संघर्षमय जीवन जगत त्यांनी,अशाप्रकारे उच्चशिक्षण पूर्ण केल्याने, त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी व त्यांचा यथोचित सत्कार करण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील विविध संस्था- संघटनांच्या पदाधिकार्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.व त्यांचा यथोचित सन्मान केला.

यावेळी, डॉ. स्नेहा यांनी त्यांच्या रशियातील शिक्षण घेताना त्यांनी केलेल्या संघर्षमय जीवनाची व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या कुटुंबीयांच्या त्यागाची कहाणी सांगितली. डॉ. स्नेहा यांच्या शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन देणारे त्यांचे वडील, प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक तर आई अंगणवाडी सेविका आहे. त्यांनी आपल्या मुलीला परदेशात शिक्षण पूर्ण करण्यासाठी, सर्व संपत्ती पणाला लावली व मुलीचं शिक्षण पूर्ण केलं.

यावेळी बोलताना, डॉ. स्नेहा पारधी यांचे वडील श्री.सुरेश पारधी सर म्हणाले की “शिक्षणात किती ताकद आहे हे मला समजल्याने मी मुलीच्या शिक्षणात कोणतीच कमी पडू दिली नाही,प्रसंगी कर्ज काढून मुलीला शिकवलं. आदिवासी समाजातील मुलांनी शिक्षणाचं महत्त्व समजून घेऊन, शिक्षण पूर्ण करायालाच हवं.”

यावेळी डॉ.राहुल जोशी, किसान सभेचे, राजु घोडे,अमोद गरुड, विकास भाईक,आदिम संस्थेचे, प्रा.डॉ.हनुमंत भवारी, बाळू काठे, आदिवासी अधिकार राष्टीय मंचाचे व आदिवासी ठाकर संघर्ष समितीचे, अर्जुन काळे, संदीप केवाळे,एस .एफ.आय. विद्यार्थी संघटनेचे, पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी,आंबेगाव तालुका अध्यक्ष दिपक वाळकोळी व सहसचिव हरिदास घोडे इ. उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *