स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशनकडून ११४ गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

आपला आवाज न्यूज नेटवर्क
दि.१३ जुलै २०२२

बातमी प्रतिनिधी : रामदास सांगळे विभागीय संपादक,जुन्नर

बेल्हे 

         बेल्हे (ता.जुन्नर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री बेल्हेश्वर विद्यालयातील ११४ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप केले.गुरू पौर्णिमेचे अवचित्त्य साधून विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले तसेच शाळेतील शिक्षकांचा रोपटे देऊन सन्मान केला.


                 स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशन ही संस्था तालुक्यात गेली वीस वर्षे कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद दत्तक विद्यार्थी योजनेद्वारे गोरगरीब भूमिहीन शेतमजुरांच्या तसेच आईवडील नसलेल्या मुलांना सर्व प्रकारची मदत करून त्या मुलांचे प्रभावी शैक्षणिक पुनर्वसन केले जाते. या विद्यार्थ्यांची शालेय फी भरण्यापासून तर त्यांना आवश्यक सर्व शैक्षणिक साहित्य तसेच गणवेश पुरवण्यापर्यंतचा सर्व खर्च फाउंडेशन करते.गेल्या सतरा वर्षांत आजपर्यंत जवळपास ९४७ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. यावर्षी या योजनेसाठी या वर्षी शाळेतील ११४ विद्यार्थ्यांची निवड फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना बुधवार (दि.१३) रोजी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत श्री बेल्हेश्वर विद्यालयात करण्यात आले.

 फाउंडेशनने सन २०१७ पासून सुरु केलेल्या संत तुकाराम वृक्ष संगोपन अभियानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने बेल्हे गाव आणि पंचक्रोशीत गेल्या पाच वर्षात तब्बल पाचशेहून अधिक देशी वृक्षांचे रोपण करून ते सर्व वृक्ष वेळप्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करून यशस्वीरीत्या जगवले आहेत. या अभियानात सहभाग घेऊन मोलाचे योगदान देणाऱ्या विद्यार्थी तसेच नागरिकांचा संस्थेच्या वतीने दरवर्षी सन्मानदेखील केला जातो. फाउंडेशन राबवत असलेल्या या अभिनव उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनास मोलाची मदत झाली आहे.


                स्वाइन फ्लू आणि कोरोना सारख्या साथीच्या रोगांच्या काळात देखील फाउंडेशनने नागरिकांमध्ये जागृती निर्माण करून संकटकाळात त्यांना मदत केली आहे. कोरोना काळात अर्सेनिक अल्बमच्या तब्बल दीड लाखाहून अधिक रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप संस्थेने नागरिकांना केले. तसेच या काळात लॉकडाऊनमुळे रोजगाराअभावी उपासमारीशी झुंजणाऱ्या शेकडो कुटुंबांना फाउंडेशनने ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाद्वारे महिनाभर पुरेल इतक्या किराणा वस्तूंचे मोफत वाटप करत आधार दिला आहे. याच काळात फाउंडेशनने ‘हाक आमची साथ तुमची’ या उपक्रमाद्वारे नागरिकांच्या मदतीने जवळपास वीस महिने वेसदरे आणि पाडळी दर्या येथील उपासमार होत असलेल्या वन्य प्राण्यांना फळे आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा केला आहे.


                 मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने फाउंडेशनने बेल्हेश्वर विद्यालयात मोफत ‘सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन’ बसवले आहे. आणि मुलींमध्ये आरोग्य विषयक जागृती करण्यासाठी तसेच त्यांचे शंका समाधान करण्यासाठी फाउंडेशनने या क्षेत्रातील विविध तज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन सातत्याने केले आहे. याशिवाय नागरिकांच्या आरोग्य वृद्धीसाठी मोफत योग शिबिरांचे आयोजन करणे, भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे, लोकमान्य टिळक पुस्तक पेढी योजनेतून होतकरू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पुरवणे आदी कामे फाउंडेशन निरंतर करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *