भीमाशंकर देवस्थान परिसरातील शांतता व पावित्र्य राखण्यासाठी घोडेगाव पोलीस कटिबद्ध

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१३ जुलै २०२२

भिमाशंकर


घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत तीर्थक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणचे वातावरण व पाऊस/ धुके यामुळे पर्यटकी मोठ्या प्रमाणावर येत असतात. यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अर्थव्यवस्थेला पर्यटनाच्या माध्यमातून चालना मिळते. अत्यंत निसर्गरम्य व शांत असणाऱ्या या पट्ट्यामध्ये मागील काही दिवसापासून खेड ,आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर या लगतच्या तालुक्यामधून येणाऱ्या स्थानिक हुल्लडबाज तरुणांच्यामुळे पवित्र अशा तीर्थक्षेत्र ठिकाणी वातावरण दूषित होत आहे.

हुल्लडबाज तरुणांच्यावर लक्ष ठेवून कठोर कारवाई सुरू

याला आळा घालण्यासाठी घोडेगाव पोलीस ठाण्याकडून वेळोवेळी कारवाया केल्या जातात अपुऱ्या मनुष्यबळामुळे काही वेळा भाविकांच्या वाहतूक व्यवस्थेवर जास्त लक्ष दिले गेल्यामुळे हुल्लडबाज तरुणांच्यावर कारवाया कमी प्रमाणात होत होत्या. परंतु आता श्रावण महिन्याचे अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख सर यांच्याकडून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. या मनुष्यबळाचा वापर वाहतूक नियमांना सोबतच हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांच्या वर कारवाया करण्यासाठी खाजगी वाहन व साध्या विषयातील दोन टीम सतत गस्त घालणार आहेत. व अशा तरुणांच्या वर कठोर कारवाई केली जाणार आहे.

काल दिनांक 12 जुलै रोजी खाली नमूद दोन तरुणांच्या गटावर कारवाई करण्यात आली असून त्यांना आज माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव यांच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. भीमाशंकर तीर्थक्षेत्राचे पावित्र्य अभाधित राखणे व येणाऱ्या भाविकांना सुरक्षित वातावरण देणे यासाठी माननीय अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे सर व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष मोहीम राबवली जात आहे.

लढबाजी करणारे तरुण हे स्थानिक परिसरातीलच आहेत, तरुण मुलांनी आपले करिअर चुकीच्या प्रकारामुळे अडचणीत येणार नाही याची काळजी घ्यावी .पालकांनीही विशेषतः आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे. यापुढे जे कोणी पवित्र तीर्थक्षेत्राचे ठिकाणी किंवा रस्त्यावर डान्स करणे, मोठ्याने ओरडणे, गाड्यांचे कर्कश्य आवाज करत गाड्या पळवणे, कपडे काढून फिरणे, दारू पिण्यासाठी बसणे अशा प्रकारचे वर्तन किंवा महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांनी अश्लील वर्तन केल्याचे आढळले तर पोलीस प्रशासन योग्य कारवाई करण्यासाठी सक्षम आहे हे कृतीतून दाखवून दिले जाईल.

कारवाई करण्यात आलेला ग्रुप नंबर 01

महाराष्ट्र पोलीस कायदा 1951कलम 102,103,110,112,117 मोटार वाहन कायदा कलम 3(1), 181,128(1), 194(सी), 119(2), 177प्रमाणे
आरोपी – 1) दिपक साहेबराव भोर, वय 25वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा आवसरी खु।। भोरवाडी ता आंबेगाव जि पुणे
2) पंकज मंगेश भोर, वय 23वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा आवसरी खु।। तांबडेमळा ता आंबेगाव जि पुणे
3) सागर राजेंद्र शिंदे, वय 22 वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा आवसरी खु।। भोरमळ ता आंबेगाव जि पुणे
4) संदेश अविनाश भोर, वय 21वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा आवसरी खु।। भोरमळा ता आंबेगाव जि पुणे
5) प्रशांत सुरेश भोर, वय 23वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा आवसरी खु।। तांबडेमळा ता आंबेगाव जि पुणे
6) अक्षय़ गणपत भोर, वय 23वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा आवसरी खु।। भोरमळा ता आंबेगाव जि पुणे
7) गणेश बबन तांबडे, वय 21वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा आवसरी खु।। तांबडेमळा ता आंबेगाव जि पुणे
8) सिद्देश निवृत्ती गटे, वय 25वर्षे, रा आवसरी खु।। भोरमळा ता आंबेगाव जि पु पुणे

कारवाई करण्यात आलेला ग्रुप नंबर 02

महाराष्ट्र पोलीस कायदा 1951कलम 102,103,110,112,117 मोटार वाहन कायदा कलम 128(1), 194(सी), 119(2), 177प्रमाणे
आरोपी – 1) दिलीप जयसिंग जांभळकर, वय 29वर्षे, रा गव्हाणवाडी ता श्रीगोंदा जि अमदनगर
2) नितीन मल्हारी श्रीराम, वय 25वर्षे, रा गव्हाणवाडी ता श्रीगोंदा जि अमदनगर
3) बंटी उर्फ रविंद्र कैलास गव्हाणे, वय 22वर्षे, रा गव्हाणवाडी ता श्रीगोंदा जि अमदनगर
4) साहील असिफ शेख, वय 18वर्षे, रा गव्हाणवाडी ता श्रीगोंदा जि अमदनगर
5) प्रविण उर्फ लालु प्रकाश राक्षे, वय 18वर्षे, रा गव्हाणवाडी ता श्रीगोंदा जि अमदनगर
6) संदिप ज्ञानदेव चौधरी, वय 30वर्षे, रा पारणेर हवलदारवस्ती ता पारनेर जि अमदनगर
7) अविनाश विलास गव्हाणे, वय 21वर्षे, रा गव्हाणवाडी ता श्रीगोंदा जि अमदनगर
8) संकेत कल्याण कचरे, वय 23वर्षे, रा गव्हाणवाडी ता श्रीगोंदा जि अमदनगर
9) अदित्य एकनाथ पवार, वय 20वर्षे, रा गव्हाणवाडी ता श्रीगोंदा जि अमदनगर 1
10) आदित्या सुनिल कु-हाडे, वय 22वर्षे, रा गव्हाणवाडी ता श्रीगोंदा जि अमदनगर


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *