दावोसला काय जाताय गुजरातला जा; संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा

दि. १६/०१/२०२३

पिंपरी

पिंपरी : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने स्वित्झर्लंड येथील दावोस इथं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रवाना झाले आहेत.

या परिषदेत २० उद्योगांसोबत १ लाख ४० हजार कोटींचे सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. दरम्यान त्यांच्या या दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे .दावोसमधून काय येणार हे माहिती नाही. पण, महाराष्ट्रात नाकाखालून जे काही प्रकल्प पळवून नेले आहे, ते आणून दाखवा. वेदांता फॉक्सकॉन, एअरबस प्रकल्प हे गुजरात आणि इतर राज्य घेऊन गेले. ते आधी घेऊन आला तर दावोसला जाण्याला अर्थ आहे. दावोसला जाण्याऐवजी गुजरातला जा असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना लगावला आहे.

मुंबईमध्ये बरेच प्रकल्प हे महाविकास आघाडीच्या काळात झाले आहेत. मुंबई पालिकेत शिवसेना सत्तेत असताना उद्घाटने झाली. अनेक प्रकल्प सुरू झाले.आता त्याच प्रकल्पासाठी पुन्हा पंतप्रधानांना बोलावले जात आहे. जे प्रकल्प झाले त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे, हे त्यांच्या प्रतिमेला डाग लावण्यासारखे आहे’, अशी टीकाही राऊतानी केली आहे.

दावोसमध्ये १६ ते २० जानेवारी दरम्यान वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबईत येणार आहेत. विविध विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यावरुनही संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान या दौऱ्यावरून संजय राऊत आणि सह अनेक जण टीका करतायेत. अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *