तासगाव सांगली रस्त्यावरील कोल्डस्टोअरेज आग प्रकरणी अंदाजे 5 कोटीचे नुकसान; कोल्डस्टोअरेज व्यवस्थापक प्रकाश सावंत यांनी दिली माहिती…

राजू थोरात तासगाव सांगली जिल्हा प्रतिनिधी

तासगाव सांगली रस्त्यावरील श्री कृपा ॲग्रोटेक कोल्ड स्टोअरेजला
दिनांक 8 रोजी भीषण आग लागली होती..
याबाबत तासगाव पोलिसांत फिर्याद श्रीकृष्णा चंद्रकांत जाधव दिली आहे..वासुबे हद्दीत गट नंबर 348-2 मध्ये श्रीकृपा ॲग्रोटेक कोल्ड स्टोअरेज मध्ये अक्षय प्रदीप पाटील राहणार नागाव कवठे हे मॅनेजर म्हणून नियुक्त होते.तर व्यवस्थापन प्रकाश सावंत करीत होते
याबाबत प्रकाश सावंत यांनी माहिती दिली की
दी 8 रोजी सकाळी 6-30 वाजता अक्षय प्रदीप पाटील मॅनेजर व माझ्या यांच्या लक्षात आले कोल्डस्टोअरेज मधून धूर येत आहे. आम्ही लगेच स्टोअरेज मालक श्रीकृष्णा चंद्रकांत जाधव यांना फोन केला की सदर कोल्डस्टोरेजमधून धूर येत आहे–
त्यानंतर श्रीकृष्णा जाधव हे उमदी वरून तासगाव येथे हजर झाले ,आम्ही पटकन तासगाव, विटा, सांगली ,इस्लामपूर ,विटा नगरपालिकेच्या अग्निशामकला फोन केले रात्री उशिरा आग आटोक्यात आली
पुढे व्यवस्थापक प्रकाश सावंत यांनी सांगितले की कोल्ड स्टोअरेज मध्ये बेदाना व यंत्रसामग्री असे 5 कोटीचे अंदाजे नुकसान झाले आहे– सदर आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचे सांगण्यात आले आहे..
आम्ही तासगाव पोलीस ठाण्यात दिली आहे– कोणत्याही शेतकऱ्यांचे बेदाण्याची पैसे बुडणार नाहीत..या बाबत तासगाव पोलीसही तपास करत आहेत.आमचे सहकार्य शेतकरी वर्गाला राहील असे भावनिक होऊन व्यवस्थापक प्रकाश सावंत यांनी माहिती दिली
याबाबत व्यवस्थापक प्रकाश सावंत काय म्हणाले ते पाहूया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *