पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भाजपच्या माजी नगरसेविका कमल घोलप यांची कन्या प्रियंका उमरगेकर यांची आत्महत्या

रोहित खर्गे
विभागीय संपादक
११ जुलै २०२२

निगडी


पिंपरी चिंचवड महानगरपाकिकेच्या भाजपच्या निगडी यमुनानगर प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेविका कमल घोलप आणि उद्योजक बापूसाहेब घोलप यांची कन्या आणि आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर यांची सून प्रियांका उमरगेकर यांनी काल रविवारी संध्याकाळी ६ ते ७ यावेळेत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आळंदी पोलिसांकडून मिळाली आहे.

शेजारच्यांकडून माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहचले होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात केलेल्या शवविच्छेदन अहवालातून आत्महत्या केल्याची समोर आले आहे.

काही महिन्यांपूर्वीच प्रियांका चा विवाह आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचा मुलगा अभिषेक याच्याशी झाला होता. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अजून समोर आले नसून आळंदी पोलीस पुढील तपास करत आहेत. त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत आज सोमवारी दुपारी ३ वाजता करण्यात येणार असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *