लेखी आश्वासना नंतर आंबेगाव तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे आंदोलन मागे

घोडेगाव – आंबेगाव ब्युरोचिफ,मोसीन काठेवाडी
आंबेगाव तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या 4511च्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवार दि.१०/०३/२०२१ पासून बेमुदत काम बंद आंदोलन पंचायत समिती घोडेगाव या ठिकाणी करण्यात आले होते त्यामध्ये तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतचे कर्मचारी सहभागी झाले होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.जालींदर पठारे यांनी यांच्या दालनात बैठक बोलाविण्यात आले  त्यास सहायक गटविकास अधिकारी लामहाटे,विस्तार अधिकारी हुजरे साहेब,ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अनिल  टेमकर,ग्रामसेवक संघटनेचे मार्गदर्शक जनार्दन नाईकडे भाऊसाहेब हे उपस्थित होते त्याप्रमाणे आंदोलना मधील सर्व  शासन अधिसूचने प्रमाणे  कर्मचारी यांच्या मागण्या असून अंमलबाजवणी करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग काम करत असुन त्यांचे पगार वेळेवर व्हावे, कर्मचारी यांचे अपघाती विमा काढला जाव  तसेच सेवापुस्तक अद्ययावत केले जावे आणि ,पाणीपुरवठा कर्मचारी यांना त्यांच्या सुरक्षेसाठी साहित्य दिले जावे,राहणीमान भत्ता,शासन नियमाप्रमाणे किमान वेतन दिले जावे अशा अनेक अडचणी   सोडविण्यासाठी विस्तार अधिकारी यांना दप्तर तपासणी करणे कमी आदेश दिले असून सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मागण्या पूर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी दिनांक २१/०३/२०२१ पर्यंत मुदत दिली आहे.
या वेळी   लेखी आश्वासन घेते जिल्हा अध्यक्ष प्रदीप पडवळ तालुका अध्यक्ष विकास पोखरकर. उपाध्यक्ष रामदास इंदोरे , सचिव कैलास टाव्हरे, महिला अध्यक्ष अर्चना गावडे, उपाध्यक्ष विजया भोर, सचिव रेश्मा आदक,  अनिल भोर, संदीप मनकर, संगीता हिंगे, शांताराम साबळे,बजरंग वंजारी, गीता राक्षे, गीतांजली पंधारे,सुजाता हिंगे , दशरथ बोऱ्हाडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *