ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके
श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी शिवजयंतीचे औचित्य साधून आंम्ही जिजाऊंच्या लेकी प्रतिष्ठान मार्फत भव्य दिव्य अशी महिला बाईक रँली आयोजिण्यात
आली होती.या महिला बाईक रँलीचे हे तिसरे वर्षे होते. विघ्नहराच्या मंदीरा समोर देवस्थानचे अध्यक्ष बी.व्ही.मांडे साहेब यांच्या हस्ते श्रींस श्रीफळ फोडून व शिवरायांच्या पुतळ्यास औक्षण करून या महिला रँलीस सुरुवात झाली. या रँलीत सहभागी होणयासाठी ओझर ,ओतूर ,नारायणगाव
आळेफाटा , खेड , जुन्नर ,चाकण, पुणे इत्यादी अनेक ठिकाणांहून महिला व तरुण युवती आल्या होत्या .
या रँलीस तरुण युवती व महिलांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला.जय जिजाऊ जयशिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय य घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता. यामुळे सर्व वातावरण शिवमय झाले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व शिवभक्तांना मास्क चे वाटप व अल्पोपहार देण्यात आला.या भव्य रँलीस सांस्कृतिक भवन ओझर येथून सुरुवात झाली. तर ओझर ,नारायणगाव त किल्ले शिवनेरी व पुनश्च ओझर येथे येऊन या महिला बाईक रँलीची सांगता झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण गोळे घराण्याच्या चौदावे वंशज कु.मोनिका गोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांंचे लाठी काठी ,तलवार बाजी व दांडपट्टा इत्यादी मर्दानी खेळ पाहून ओझरकर मंडळी आश्चर्यचकीत झाले .
वेशीजवळ रिंगण धरून सर्व युवक युवतींनी ह्या फुगड्या खेळत शिवजयंतीचा आनंद लुटला. या रँलीसाठी आंम्ही जिजाऊंच्या लेकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व महिला पदाधिकारी व तरुण युवक युवतींनी खुप मेहनत घेतली .