यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात रंगला दिंडी सोहळा.

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
११ जुलै २०२२

घोडेगाव


मा.गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब संस्थापक अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या आंबेगाव वसाहत येथील यशवंतराव चव्हाण माध्य.विद्यालयात शनिवार दि.9 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. इ. 5 वी चा विद्यार्थी आयुष काळे व विद्यार्थिनी लक्ष्मी घोडेकर यांनी विठुरायाची व रुक्मीणीची आकर्षक वेशभुषा करून दिंडीमध्ये अग्रभागी राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले तसेच इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेतील संत जनाबाई,संत मीराबाई,संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत मुक्तबाई, संत सावता माळी ,संत चोखा मेळा या संतांच्या वेषभूषा केल्या तसेच डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या नऊवारी साडीतील विद्यार्थिनी,सजवलेली पालखी,भालदार,चोपदार, टाळकरी,मृदुंगमनी व भगव्या पताका घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत गावातून दिंडी प्रदक्षिणा पूर्ण केली .यामध्ये समाज प्रबोधनपर फलक हाती घेऊन समाज जागृती करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यानी अभंग, भजनाच्या तालावर तल्लीन होऊन विठठ्ल महिमा असलेली नृत्य सादर केली तर शिक्षक , विद्यार्थ्यांनी, पालकांनी फुगडीचा ही ठेका धरला.तसेच उभे व गोल रिंगण सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

पालखीचे पूजन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.राजाभाऊ घोलप , विजयराव घोलप, श्री राजाभाऊ पानसरे, श्री डॉ. मोहन विरणक , श्री खंडू खंडागळे, श्रीमती सुरेखाताई घोलप उपस्थित पालक व ग्रामस्थ यांच्या हस्ते पालखी पूजन करून पांडुरंगाच्या महाआरतीने दिंडीची सुरुवात करण्यात आली . शालेय आषाढी दिंडीच्या निमित्ताने सर्वांना प्रत्यक्ष दिंडीची अनुभूती दिली.दिंडीची सांगता विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन झाली.या दिंडीचे आयोजन शाळेचे सर्व शिक्षक वृंद सौ. माणिक हुले , सौ.वैशाली काळे, सौ . वंदना मंडलिक , श्री.संजय वळसे, सौ . लक्ष्मी वाघ , श्री.वैभव गायकवाड,सौ. गौरी विसावे, श्रीम.नीलम लोहकरे. श्री.संतोष पिंगळे,श्री गुलाब बांगर, श्री.सुभाष साबळे, श्री.लक्ष्मण फलके यांनी केले. दिंडी सोहळा आयोजित करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अविनाश ठाकूर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *