घोडेगाव येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
२१ जून २०२२

घोडेगाव


जनता विद्या मंदिर घोडेगाव येथे आज दिनांक २१जून २०२२ रोजी योग दिनानिमित्त जनता विद्या मंदिर घोडेगाव, कनिष्ठ महाविद्यालय घोडेगाव, न्यू इंग्लिश स्कूल घोडेगाव मधील सर्व विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संस्था पदाधिकारी यांना प्रशालेचे शिक्षक श्री कदम सर यांनी आसने व प्राणायाम यांचे मार्गदर्शन करून यौगिक प्रात्यक्षिके घेतली. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अजितशेठ काळे तसेच संचालक माननीय श्री सुर्यकांत शेठ गांधी हेही उपस्थित होते.

तसेच विद्यालयाच्या प्राचार्या सौ. अलका शरद घोडेकर उपप्राचार्य श्री. भिटे सर, उपमुख्याध्यापक श्री.अविनाश शिवाजी कळंबे सर, पर्यवेक्षक श्री. अनिल काळे सर व न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. मेरी फ्लोरा डिसुझा, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी योग दिनानिमित्त उपस्थित होते. योग दिनानिमित्त श्री. संजय कदम सर यांनी आयुष मंत्रालयाने दिलेल्या प्रोटोकॉल नुसार आसने, प्राणायाम घेऊन यागाचे महत्त्व विषद केले.

आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ, घोडेगाव या संस्थेतील सर्व शैक्षणिक संकुलातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी व संस्था पदाधिकारी यांनी सर्वांनी योग प्रात्यक्षिके केली. श्री. अनिल काळे सर यांनी योग दिनाचे प्रास्ताविक केले तसेच उपस्थितांचे आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *