बोऱ्हाडेवाडी, जाधववाडीत सामाजिक कामाचा धडाका, अतिष बारणेंचा पुढाकार

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२१ जून २०२२

पिंपरी


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्याने तयार झालेल्या प्रभाग क्रमांक ३ (बो-हाडेवाडी, जाधववाडी)मध्ये राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष अतिष बारणे यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपला जनसंपर्क तगडा केला आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या खासदार फंडातून त्यांनी विविध विकासकामांना गती दिली आहे. तर, माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून त्यांनी जनतेच्या मनामध्ये आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे.

पक्षाच्या वरीष्ठ नेतृत्वाकडून घेतली विशेष दखल

रक्तदान शिबीर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, कामगारांना विमा, कोविड काळात लसीकरण आदींसह विविध कामे केली जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. ‘आधी समाजकारण मग राजकारण’ अशा धोरणानुसार त्यांचे काम सध्या जोमाने सुरू आहे. पुढील काळातही प्रभागातील रखडलेले प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, विविध खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, कामगार, मजूर, व्यवसायिक, उद्योग क्षेत्रात काम करणा-या कामगार महिला वर्गांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा लढा सुरूच आहे.

नेत्यांनी जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊन केले कौतुक

बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी प्रभाग ३ मध्ये विकासकामांचा देखील त्यांनी पाठपुरावा केला. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या खासदार फंडातून त्यांनी प्रिस्टन ग्रीन व सिल्व्हर नाईन सोसाटीमध्ये डांबरीकरणाचे काम मार्गी लावले. प्रभागातील क्रीडा क्षेत्राला गती मिळावी तसेच सर्वसामान्य घरातील खेळाडू घडावेत यासाठी बारणे स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हाफपीच क्रिकेट स्पर्धा भरविल्या. चांगले खेळाडू घडवण्यासाठी त्यांनी कायमच पुढाकार घेतलेला आहे. तसेच, नागरिकांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी मदत व्हावी म्हणून त्यांनी प्रभागात ओपन जीम तयार केली. आज नागरिकांना व्यायाम करण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे.

अतिश बारणेंच्या कार्याची मंत्री महोदयांकडून दखल

माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारणे यांनी केलेल्या सामाजिक कामाची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आदीसह मंत्री महोदयांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांना प्रभाग ३ मध्ये राष्ट्रवादीचे ‘विनिंग कॅँडिडेट’ मानले जाते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *