एस.आर.केदारी बालक मंदिर नारायणगाव वारूळवाडी मध्ये योग दिन उत्साहात साजरा

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
२१ जून २०२२

ओझर


आज दि. २१/०६/२०२२ रोजी श्रीमती एस. आर. केदारी बालक मंदिर मध्ये योग दिन साजरा झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. स्मिता पारखे मॅडम यांनी केले. योग दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांकडून व शिक्षकांकडून भालेराव मॅडम यांनी योगासनांची विविध प्रात्यक्षिके करून घेतली. व यात शाळेचे चेअरमन मुख्याध्यापिका ही सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाला ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. प्रकाश पाटील सर ,कार्याध्यक्ष अनिल मेहेर सर, कार्यवाह रवींद्र पारगावकर सर, सहकार्यवाह व शाळेचे चेअरमन अरविंद भाऊ मेहेर सर शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता पारखे मॅडम ,उपमुख्याध्यापिका अरुणा कानडे मॅडम व सर्व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बांगर मॅडम यांनी केले. अशाप्रकारे उत्साही व चैतन्यमय वातावरणात योग दिन साजरा झाला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *