मतदानाद्वारे रिपाई(आठवले) पिंपरी चिंचवड शराध्यक्षपदी युवा स्वप्नील कांबळे विराजमान

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१४ ऑक्टोबर २०२१

पिंपरी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शराध्यक्षपदी भोसरी येथील युवा नेतृत्व स्वप्नील रामदास कांबळे यांची रविवार दि १० ऑक्टोबर रोजी लोकशाही पद्धतीने सक्रिय सदस्यांच्या मतदानातून झालेल्या निवडणुकीत कांबळे हे बहुमताने विजयी झाले.राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार लोकशाही पद्धतीने निवड व्हावी असे आयोजन होते. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरात २१५५ क्रियाशील सदस्य झाले होते. पक्षाच्या घटनेनुसार क्रियाशील सदस्यच मतदान करू शकतात. एक क्रियाशील सदस्य जेव्हा होतो , जेव्हा तो पन्नास साधे सभासद करू शकतो. त्यानुसार निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. नवनिर्वाचित शहराध्यक्षाच्या बरोबर लवकरच नवीन कार्यकारिणी तयार होईल. विधानसभा मतदार संघ कार्यकारिणी जाहीर होईल.

रिपब्लिकन पार्टी ऑफ(आठवले) इंडियाच्या शराध्यक्षपदी स्वप्नील कांबळे यांची निवड

येणाऱ्या काळात शहरातील भ्रष्टाचार, झोपडपट्टीमधील नागरिकांचे प्रश्न, स्वच्छ व मुबलक पाणी, आरोग्य सेवा, पालिकेतील ठेकेदारी पद्धती, नोकरी भरतीचा प्रश्न, इत्यादी प्रश्नावर आवाज उठवून नवीन कार्यकारिणी काम करेल. येणाऱ्या २०२२ निवडणूकत एकजुटीने पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न असेल असे पिंपरी चिंचवड चे निरीक्षक सूर्यकांत वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेत्या माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, रमेश चिमुरकर, सम्राट जकाते, प्रणव ओव्हाळ, सुधाकर वारभुवन, के.एम बुक्तर, गणेश गायकवाड, राजेंद्र कांबळे, लिंबराज कांबळे या असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *