बालक मंदिर मध्ये तिळगुळ समारंभ उत्साहात साजरा

ओझर प्रतिनिधी :- मंगेश शेळके 

दि.२८ जानेवारी २०२३


श्रीमती एस. आर. केदारी बालक मंदिर मध्ये शुक्रवार दिनांक 27/ 1/ 2023 रोजी मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ समारंभ कार्यक्रम साजरा करण्यात आला. शाळेच्या मैदानावर मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून तसेच मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली .शाळेतील संगणक शिक्षिका योगिता कदम मॅडम यांनी मकर संक्रांतीची माहिती सांगितली. या दिवसांत तीळ आणि गूळ यांचे महत्व मुलांना त्यांनी सांगितले. मकर संक्रांतीच्या भोगी,संक्रांत, व किंक्रांत या तिन्ही दिवसांची माहिती सांगितली.तसेच शाळेचे चेअरमन मा. श्री अरविंद भाऊ मेहेर सर, शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. सुनिता पारखे मॅडम व शिंदे मॅडम यांनी तिळगुळ समारंभाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या व तिळगुळ घ्या गोड गोड बोला. अशा गोड पद्धतीने विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त मा. डॉ. श्रीकांत विद्वांस सर,ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. प्रकाश मामा पाटे, ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष मा .श्री. सुजित खैरे सर, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न, कृषिभूषण मा. श्री. अनिल तात्या मेहेर सर,

 

ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह मा. श्री. रवींद्र पारगावकर सर, ग्रामोन्नती मंडळाचे सहकार्यवाह व बालक मंदिरचे चेअरमन मा. श्री. अरविंदभाऊ मेहेर सर,ग्रामोन्नती मंडळाचे संचालक मा. श्री. शशिकांत वाजगे सर, बालक मंदिर समितीच्या सदस्या मा.सौ.मोनिकाताई मेहेर मॅडम, ग्रामोन्नती मंडळाचे संचालक मा.श्री. रमेश जुन्नरकर सर, ग्रामोन्नती मंडळाचे सदस्य मा. श्री. देविदास भुजबळ सर ,शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. सुनिता पारखे मॅडम, गटशिक्षणाधिकारी सौ. अनिता शिंदे मॅडम, विस्तार अधिकारी सौ.माधुरी शेलार मॅडम, विषय तज्ञ दीपा थोरात मॅडम उपस्थित होत्या. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.रत्ना डुंबरे मॅडम उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना तिळगुळ समारंभ निमित्त शाळेच्या वतीने माननीय चेअरमन अरविंद भाऊ मेहेर सर , गटशिक्षणाधिकारी शिंदे मॅडम यांच्या हस्ते तिळाच्या वड्या म्हणजेच तिळगुळ वाटला गेला.

अशा प्रकारे तिळगुळ समारंभचा कार्यक्रम आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेच्या सहशिक्षिका मनीषा फुलसुंदर मॅडम यांनी केले. व कार्यक्रम संपन्न झाला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *