जुन्नर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
०६ जून २०२२

आळेफाटा


जुन्नर तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण वडगाव कांदळी या ठिकाणी आढळून आला आहे. २६ मार्च २०२२ रोजी तालुका कोरोना मुक्त झाला होता. त्यात सोमवार दि.६ रोजी अचानक एक रुग्ण वाढल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. जुन्नर तालुक्यात २६ मार्च पर्यंत एकूण २७ हजार १७ नागरिक कोरोना बाधित झाले होते. त्यापैकी २६ हजार ३१७ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले. तर दोन वर्षात तालुक्यातील ६९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तालुक्यात चांगल्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे तिसरी लाट कमी प्रमाणात दिसून आली.सध्या मुंबईसह राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून चौथी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.

नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन तालुक्याच्या आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *