रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगरच्या अध्यक्षपदी अजित वाळुंज व सचिवपदी जितेंद्र गुजराथी यांची निवड

राजगुरूनगर : प्रतिनिधी अक्षता कान्हुरकर

दिनांक: 14/7/2019

रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगरच्या अध्यक्षपदी अजित वाळुंज व  सचिवपदी जितेंद्र गुजराथी यांची नुकतीच निवड झाली. या क्लबचा पदग्रहण समारंभ शनिवारी (दि. १०) येथील आनंदी आनंद मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रांतपाल पंकज शहा, प्रिया शहा, उपप्रांतपाल योगेश भिडे, मेंबरशिप डायरेक्टर शितल शहा, फाऊंडेशन डायरेक्टर पंकज पटेल, पल्स पोलिओ डायरेक्टर नितीन पाटील, टास्क फोर्स सेक्रेटरी सचिन काजळे, पुणे मेट्रो क्लब, पुणे लोकमान्य नगर क्लब, पुणे इ-डायमंड क्लब, पिंपरी-चिंचवड क्लब व झोन २ क्लबचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.   

                       
यावेळी स्टॅनली ब्लॅक अँड डेकर कंपनी आणि पिंपरी रोटरी क्लब व राजगुरूनगर रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यातील कडूस, पाईट, कुडे, आंबोली, वाडा, डेहणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राना सहा ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशिनचे लोकार्पण करण्यात आले.   
मावळते अध्यक्ष राहुल वाळुंज यांनी गतवर्षी कोविडच्या काळात केलेल्या भरघोस प्रकल्पाचा आढावा सादर केला. पंकज शहा यांनी कोरोना या महामारीमध्ये  दिलेल्या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशिन बद्दल व केलेल्या सर्व कामाबद्दल सर्व क्लबचे कौतुक केले व यापुढेही राजगुरूनगर क्लबच्या प्रत्येक प्रकल्पाच्या उदघाटनाला उपस्थित राहणार याची ग्वाही दिली.                        नवनिर्वाचित अध्यक्ष अजित यांनी सन २०२१-२२ मध्ये होणाऱ्या सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांची विस्तृत माहिती दिली. समाजातील प्रत्येक दुर्बल घटकांना मदत करून पर्यावरण संतुलन टिकविण्यासाठी प्रयत्न करणार असेही सांगितले. राजगुरूनगर क्लबच्या पाच नविन सभासदांचे रोटरी पिन लावून स्वागत करण्यात आले.
यावेळी राजगुरूनगर रोटरीचे सभासद श्रीकांत गुजराथी, मंगेश हांडे, सतिश नाईकरे, अविनाश कहाणे,किरण आहेर, अविनाश कोहिणकर, सुधीर मांदळे, जाबीर मोमीन, डॉ. दिलीप बांबळे, गणेश घुमटकर, प्रशांत कर्णावट, नरेश हेडा, दत्ता रुके, उमेश ढमाले, ज्ञानेश्वर करंडे, विठ्ठल सांडभोर, संतोष पडवळ, प्रविण वाईकर, पवन कासवा, उत्तम कुंभार, सुधीर येवले, अनिल थोरात, प्रथमेश जवळेकर, जयंत घोरपडे, मावळते सचिव चक्रधर खळदकर, भावी अध्यक्ष संजय कडलग व सर्व रोटरी अँन्स उपस्थित होत्या. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत गुजराथी, दत्ता रुके, मंगेश हांडे यांनी केले. संजय कडलग यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *