मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मिसिंग लिंकच्या कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

११ नोव्हेंबर २०२२

लोणावळा


पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील नवी मार्गिका-बोगद्याच्या (मिसिंग लिंक) कामाची गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार असलेला हा प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकल्पामुळे पुणे ते मुंबई हा द्रुतगती मार्गावरील प्रवास सुमारे अर्ध्या तासांनी कमी होऊ शकणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

द्रुतगती मार्गावरील नवी मार्गिका डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण

लोणावळा धरणाच्या खाली साधारण: ५०० ते ६०० फूट अंतरावरून हा बोगदा काढण्यात आला आहे. याच भागात मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकल्पाची माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, बोगद्यांमध्ये सुरक्षेची सर्व खबरदारी घेण्यात आली असून, संपूर्ण बोगद्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने सिमेंटचा थर बसिवण्यात आला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *