श्री क्षेत्र देहू आणि आळंदी पालखी सोहळा – २०२२ पूर्वतयारी आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०६ जून २०२२

पुणे


पालकमंत्री अजित पवार बोलताना सांगितले की दोन वर्षानंतर पालखी सोहळा होत असल्याने गर्दी होणार आहे . पालखी सोहळ्यात पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेचे नियोजन करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य व स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

ज्या भाविकांनी कोरोना लसीची दुसरी मात्रा किंवा वर्धक मात्रा घेतली नसेल त्यांना घेण्याबाबत आवाहन करण्यात यावं, यासाठी लसीकरणाची सुविधा करण्यात यावी. पालखी सोहळ्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांना सोहळा पूर्ण होईपर्यंत कार्य मुक्त करू नये. पंढरपूर येथे फिरते शौचालय आणि टँकरची व्यवस्था वाढवण्यात यावी.

शहरात पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक नियोजनासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सूचना कराव्यात. गरजू व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. पालखी सोहळ्याकरिता आवश्यक कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी खर्च करावा आणि प्रस्तावही पाठवावा. सुविधांसाठी पालखी तळ असलेल्या गावांना सुविधेसाठी निधी देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. पालखी मार्गावरील वाहतूक नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाय करावेत. सर्वांनी मिळून प्रशासनाला सहकार्य करावं. आळंदीला वाहनतळासाठी जागा संपादन करावी, त्यासाठी सहकार्य करण्यात येईल. सोपानदेव पालखी मार्गावरील रस्त्यातील खड्डे जिल्हा परिषदेनं त्वरित बुझवावेत. पालखी मार्गावरील शासकीय जागेची सुविधेच्या दृष्टीनं माहिती घेऊन अशा जागा पालखी सोहळ्यासाठी कायमस्वरुपी आरक्षित करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा. पालखी सोहळा चांगल्यारितीनं संपन्न व्हावा यासाठी शासन प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल. असे अजित पवार यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *