गुप्तधन मिळून देतो म्हणत आळ्यातील भोंदूबाबाकडून महिलेची ९ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२४ मे २०२२  

आळेफाटा


जमिनीतून धन काढून देतो असे सांगून वारूळवाडी (ता.जुन्नर) येथील महिलेची ९ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी आळे (ता. जुन्नर) येथील भोंदूबाबा वर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

या प्रकरणी निर्मला रमेश नारायणकर (वय-५१) या महिलेने दिलेल्या फिर्यादी वरून भोंदूबाबा अब्दुल सलाम अब्दुल कासिम इनामदार (वय ४२ ,राहणार साईव्हिला अपार्टमेंट, पाचवा मजला, रूम नंबर ५०२, आळे, ता. जुन्नर) याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अब्दुल सलाम अब्दुल कासिम इनामदार यांची व महिलेची ओळख झाली होती. आरोपीने मी मांत्रिक बाबा असून माझ्याकडे अदृश्य शक्ती आहेत. त्याद्वारे सर्व घरगुती अडचणी सोडवून घरामध्ये शांतता व वैभव नांदेल अशी उपायोजना करतो.

याशिवाय जमिनीतून धन काढून देतो अशी बतावणी करून यासाठी खर्च म्हणून आरोपीने निर्मला नारायणकर यांच्याकडून वेळोवेळी एकूण ९ लाख २५ हजार रुपयांची रक्कम घेतली. फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर निर्मला नारायणकर यांनी भोंदूबाबा अब्दुल सलाम अब्दुल कासिम इनामदार यांच्याकडे घेतलेले पैसे देण्यास टाळाटाळ केली. पैसे मागितले तर जीवे ठार मारण्याची व घराला आग लावून पेटवून देण्याची धमकी भोंदूबाबा इनामदार यांनी महिलेला दिली होती. भोंदूबाबाच्या दहशतीला कंटाळून शेवटी नारायणकर यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *