घोडेगाव येथील महाविद्यालयात क्रीडा महोत्सव संपन्न

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१४ मे २०२२

घोडेगाव


घोडेगाव येथील बी. डी. काळे महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच संपन्न झाला. महोत्सवाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.इंद्रजीत जाधव यांचे हस्ते झाले .महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना क्रीडा सहभागाची संधी मिळावी म्हणून कबड्डी ,हॉलीबॉल, क्रिकेट ,क्रॉस कंट्री व अथलेटिक्स अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धांचे सांघिक विजेतेपद मुलांमध्ये तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गाने मिळवले तर मुलींमध्ये विज्ञान शाखेने मिळवले.

तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून कबड्डी मध्ये पार्थ दौंड व कु. आश्लेषा काळे तर हॉलीबॉल मध्ये ओकार महिंद्रकर व सिद्धी बोऱ्हाडे यांची निवड करण्यात आली आहे. वैयक्तिक जनरल चॅम्पियनशिप मध्ये मुलामध्ये युवराज सोपान शेगर तर मुलींमध्ये कुमारी आश्लेषा हरिश्‍चंद्र काळे यांनी मिळवली. क्रीडा महोत्सवाचे आयोजन क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक भाऊसाहेब थोरात यांनी केले. क्रीडा महोत्सव यशस्वी झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेशशेठ काळे ,उपाध्यक्ष श्री. तुकाराम काळे सचिव ॲड. मुकुंद काळे महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. संजय आर्वीकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच प्राचार्य डॉ.इंद्रजीत जाधव व उपप्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर यांनी सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *