आपला आवाज न्यूज नेटवर्क बातमी
19/05/2021
वाशी APMC मार्केट व्यापाऱ्यांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 55 लाख रुपयांची भरीव मदत
—————
बातमी:- विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर
मुंबई:- वाशी APMC मार्केटमधील फळ व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 55 लाख रुपयांची मदत केली आहे.
APMC मार्केटमधील व्यापारी अशा कठीण परिस्थितीत नेहमीच पुढे येऊन मदत करत असतात.व्यापाऱ्यांनी एकत्र केलेला निधी कोविड काळात राज्य सरकारला मदत म्हणून उपयोगी येणार आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे.ही गरज ओळखून मार्केट मधील सर्व व्यापाऱ्यांतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज चेक द्वारे मदत देण्यात आली.यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, मार्केट मधील व्यापारी अशोक हांडे , उद्योजक संजय पानसरे ,बाळासाहेब बेंडे व नसिमभाई सिद्दीकी आदी उपस्थित होते.