शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती, उद्धव ठाकरेंची घोषणा

अतुल परदेशी
मुख्य संपादक
२६ ऑगस्ट २०२२


राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर राज्यातील अनेक घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. मराठा समाजाच्या रखडलेल्या अनेक मागण्या असतानाच मराठा क्रांती दुभंगलेली शिवसेना आणि भाजप-शिंदेसेनेला वाढता पाठिंबा अशा स्थितीत राज्यात एक महत्त्वाचं समीकरण उदयाला आलं आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षांनी एकत्र येणार असल्याचं जाहीर केलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली. आज दुपारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते.

महाराष्ट्रात सध्या प्रादेशिक पक्ष संपवून टाकण्याचं कट कारस्थान सुरु आहे. या पार्श्वभूमवीर शिवसेनेत या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी, व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. दुभंगलेली शिवसेना आणि भाजप-शिंदेसेनेला वाढता पाठिंबा अशा स्थितीत राज्यात एक महत्त्वाचं समीकरण उदयाला आलं आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षांनी एकत्र येणार असल्याचं जाहीर केलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली.

आज दुपारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते. महाराष्ट्रात सध्या प्रादेशिक पक्ष संपवून टाकण्याचं कट कारस्थान सुरु आहे. या पार्श्वभूमवीर शिवसेनेत या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी, व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.आज शिवसेना सत्तेत नसताना संभाजी ब्रिगेड आमच्यासोबत आले, याचा मोठा आनंद आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

सत्तेत असताना तर कुणीही साथ देऊ शकतात, मात्र शिवसेना आज संघर्ष करत असताना सोबत आले ते खरे लढवय्ये, तेच खरं शौर्य असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे म्हणाले, ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन अशा पक्षांशी आघाडी करून भविष्यात नवी वाटचाल सुरु करावी, असं आम्ही विविध संघटनांना आवाहन केलंय. भविष्यात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एक युती म्हणून काम करेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकीत आम्ही एकत्रपणे लढू, असं इथे जाहीर करतो.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *