मनसे च्या जिल्हाध्यक्ष पदी समीरभाऊ थिगळे यांची फेरनिवड झाल्याने शिरूर मनसेच्या वतीने केला सत्कार

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
२६ एप्रिल २०२२

शिरूर


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी, समीरभाऊ थिगळे यांची निवड करण्यात आली असुन, त्या संदर्भातील पत्र मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी नुकतेच त्यांना दिलेय. समीर भाऊ थिगळे यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी ही फेरनिवड असुन, सन २०१६ पासुन ते पुणे जिल्हा अध्यक्षपदी सलग कार्यरत आहेत. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी (खेड, आंबेगांव, जुन्नर, शिरुर-हवेली) आपली नेमणूक करण्यात येत असुन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे व कार्यक्रम इत्यादी आपण वेळोवेळी आपल्या संघटनेत निष्ठेने राबवावीत.”…असे या पत्रात म्हटले आहे.

या निवडीमुळे त्यांचा शिरूर तालुका मनसे च्या वतीने सत्कार करताना तालुकाध्यक्ष तेजस यादव म्हणाले की, “गेल्या काही वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पदी समीर थिगळे यांनी शिरूर लोकसभा मतदार संघात अनेक प्रकारची चांगली व समाजाभिमुख आंदोलने, तसेच संघटन वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळेच समीरभाऊ थिगळे यांच्या कामाची पक्षाने दखल घेतली असुन, त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष पद मिळालेले आहे. त्यांच्या निवडीमुळे शहरातील व तालुक्यातील मनसैनिकाना आनंद झाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर शहरात अनेक आंदोलने करण्यात आली आणि पुढेही होत राहतील” असेही यादव यांनी यावेळी बोलताना सांगितले.

शिरूर येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमावेळी, मनसेचे तालुकाध्यक्ष तेजस यादव, तालुका उपाध्यक्ष रवींद्र गुळादे, उपजिल्हाध्यक्ष किरण गव्हाणे, शहर अध्यक्ष अविनाश घोगरे यांच्या हस्ते थिगळे यांचा सत्कार करण्यात आला.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *