निगडी दापोडी रस्त्यावर सबवे बांधण्यात यावा – माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आयुक्तांना निवेदन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१३ एप्रिल २०२२

पिंपरी


निगडी दापोडी रस्त्यावर पिंपरी गाव कडून डेअरी फार्म मार्गे पुण्याकडे जाण्यासाठी सबवे बांधण्याचे निवेदन भाजपाचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना देण्यात आले.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, पिंपरी मिलेट्री डेअरी फार्म परिसरामध्ये रेल्वे उड्डाणपुलास रक्षा मंत्रालयामार्फत मंजुरी मिळालेली आहे. सदर कामाची निविदा प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या बी.आर,टी.एस. विभागामार्फत सुरु करण्यात आलेली आहे. या उड्डाणपुलामुळे पिंपरी गावठाण, पिंपरी कॅम्प,रहाटणी,काळेवाडी,पिंपळे सौदागर परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न नक्कीच मार्गी लागणार आहे. परंतु निगडी दापोडी रस्त्यावर पिंपरीगाव कडून डेअरी फार्म मार्गे पुण्याकडे जाण्यासाठी मोठ्या तसेच एल.एम.व्ही वाहनांना पिंपरी चौकामध्ये जाण्याशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याने पिंपरी चौकामध्ये देखील वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे पिंपरी गावातून निगडी दापोडी रस्त्यावरून पुण्याकडे जाण्यासाठी सी.एम.ई.पुलाप्रमाणे सबवे बांधल्यास वाहतूक कोंडी होणार नाही.

निगडी दापोडी रस्त्यावर पिंपरीगाव कडून डेअरी फार्म मार्गे पुण्याकडे जाण्यासाठी सबवे बांधण्याचे निर्देश बी.आर.टी.एस.विभागास देण्यात यावेत अशी आग्रही मागणी संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचेकडे केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *