पुणे ग्रामीण पोलीस दलाचा स्मार्ट पोलीसींग उपक्रम राज्यात राबवावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
२५ मार्च २०२२

पुणे


पुणे ग्रामीण पोलीस कल्याण अंतर्गत विविध उपक्रमांचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला विविध उपक्रमांचे उद्घाटन महाराष्ट्र राज्यचे उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार व गृहमंत्री श्री.दिलीप वळसे-पाटील यांचे शुभहस्ते आज दि.२६ मार्च रोजी पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण येथे पार पडला.

या प्रसंगी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,फियाट इंडिया कंपनीचे अध्यक्ष रवी गोगिया, फियाट इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष राकेश बावेजा, पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख तसेच पत्रकार बंधु व पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे उपस्थित होते.

या वेळी पुणे जिल्हा नियोजन समिती मार्फत पुरविण्यात आलेले १० चारचाकी व १२ दुचाकी वाहनांचे डायल ११२ साठी लोकार्पण, नूतनीकृत सबसिडीअरी कॅन्टीन तसेच कॅन्टीनचे ऑनलाईन खरेदी अँप व भिमाशंकर सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन, व गुणवंत पोलीस पाल्यांसाठी फियाट कंपनी मार्फत स्कॉलरशिप धनादेश वितरण असे कार्यक्रम पार पडले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमादरम्यान पुणे ग्रामीण पोलीस दलाकडील पेट्रोलपंप हे महिला पोलीसांद्वारे संचलित असल्याने त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव म्हणुन त्यांनाही प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात आले. तत्पुर्वी या कामगिरीकरीता या महिलांचा बी.पी. सी. एल. तर्फेही गौरव करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते ई-ऑफिस प्रणाली व बाणेररोड वरील पेट्रोलपंप येथील सी.एन.जी. प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान फियाट इंडिया कंपनीचे अध्यक्ष रवी गोगिया,यांनी गुणवंत विदयार्थी यांची प्रशंसा करीता पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच फियाट कंपनी तर्फे शैक्षणीक व पाण्याचे संवर्धन या उपकरमांविषयी माहिती देवुन सदरचे उपक्रम प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात चालु असलेबाबत माहिती दिली.

तसेच ई-ऑफिसचे ऑनलाईन उद्घाटन करतांना अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,यांनी फियाट कंपनीचे आभार मानुन त्यांचेकडुन सामाजिक बांधिलकी म्हणुन असे उपकरम राबविल्याबाबत समाधान व्यक्त केले.तसेच सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असलेने विदयार्थ्यानी अधीक प्रयत्न व परीश्रम करून स्वतःच्या पायावर उभे राहुन यशस्वी व्हावे बाबत विदयार्थ्याना मार्गदर्शन केले.तसेच ई-ऑफिस कार्यप्रणालीबाबत समाधान व्यक्त करून पुणे ग्रामीण जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट पोलीसिंग बाबत कौतुक केले व सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार व उपस्थितांना गुडीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.त्याच प्रमाणे गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांनी बाणेर रोड वरील सी.एन.जी. पेट्रोल पंपाचे ऑनलाईन उद्घाटन करून कोरोना काळातील पोलीसांच्या कामाची प्रशंसा करून नेहमी पोलीस दलाच्या मागे कायम खंभीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. तसेच पोलीसांसाठी घर अग्रीम स्कीम व कुटुंब आरोग्य योजनेबाबत सकारात्मक बदल करण्याचे संकेत दिले. फियाट कंपनी तर्फे राबविण्यात येणाच्या कल्याणकारी उपकरमांबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाटवे यांनी केले तर प्रास्ताविक पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मितेश घट्टे,अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *