जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून युवकांचा सत्कार.

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
१६ मार्च २०२२

ओतूर

दिवसेंदिवस शहरीकरणात वाढ होत चाललेल्या ओतूर आणि खामुंडी परिसरात नित्य काहिनाकाही बऱ्या वाईट घटना या घडतच असतात. घाट मार्गावर व नगर कल्याण महामार्गावर देखील अपघातांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे तसेच डोंगर दऱ्याखोऱ्यातही गंभीर घटना घडतच असतात, तेथे पोलीस कर्मचाऱ्यांना अशा संकट काळात स्थानिक तरुण स्वयंस्फूर्तीने मदत करीत असतात. त्याच धर्तीवर परवा खामुंडी जवळील बदगीच्या घाटात रात्रीच्या सुमारास सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळलेल्या काळ्या रंगांच्या स्कॉर्फीओ गाडीचा शोध व गाडीतील एक मृतदेह तर एका जखमीला झोळी करून , जगंल भाग त्यात काळ्याकुट्ट अंधारात बिबट्या सारख्या प्राण्यांची दहशत असतानाही जीवाची पर्वा न करता खामुंडीच्या काही युवकांनी अडीच तासांचे अथक प्रयत्न करून दोन्ही इसमाना वर काढण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती अशा सर्व युवकांची प्रसंशा करून ओतूर पोलीस ठाण्यात ता.१६ रोजी जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे हस्ते अनिल बोडके,पप्पू डुंबरे,संतोष सासवडे, कुनाल डुंबरे,हेमंत बोडके,अतुल शिंगोटे,अक्षय बोडके,शांताराम बोडके,बाळासाहेब शिंगोटे,अक्षय शिंगोटे व विघ्नेश बोडके आदींचा सत्कार करण्यात आला.

अपघात समयी युवकांची महत्वपूर्ण मदत

या युवकांचा आदर्श घेऊन संकट काळात स्थानिक युवकांनी मदत करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे,पोलीस उपनिरीक्षक अनिल केरूरकर,आकाश शेळके, पोलीस हवालदार बाळासाहेब तळपे,मुकुंद मोरे,नामदेव बांबळे, रोहित बोंबले , खंडेराव रहाणे, मदन भुसावरे,ताऊजी दाते, महेश पटारे आदी उपस्थित होते.पोलीस अधिकाऱ्यांच्या शाब्बासकीने तरुणांचा उत्साह दुणावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *