स्टुडन्ट ऑलिम्पिक असोसिएशनच्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत जुन्नर तालुका फुटबॉल क्लब व इंग्लिश मीडियम स्कूल लांडेवाडी ची चमकदार कामगिरी

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१८ ऑक्टोबर २०२२

नारायणगाव


न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे नुकत्याच झालेल्या स्टुडन्ट ऑलिम्पिक असोसिएशनच्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये जुन्नर तालुका फुटबॉल क्लब या संघाने १४ वर्षे वयाखालील गटात प्रथम क्रमांक मिळविला. तर लांडेवाडी येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ने दुसरा क्रमांक मिळविला. १७ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत जुन्नर तालुका फुटबॉल क्लबने प्रथम क्रमांक मिळवला. तर ठाणे जिल्ह्यातील पोतदार स्कूलने द्वितीय क्रमांक मिळवला.


या स्पर्धेत रूद्वेक तळपे, कार्तिक डांगे, श्लोक डांगे, शंतनू वाघमारे, शिवम रेंगडे यांनी उत्कृष्ट खेळ केला. १७ वर्षाखालील गटात आर्य घोलप या खेळाडूला बेस्ट प्लेयर हा पुरस्कार मिळाला. तसेच साई गुंजाळ, तनिष गुंजाळ, ऋषी वारुळे यांनी चमकदार खेळाचे प्रदर्शन केले.
जुन्नर तालुका फुटबॉल क्लब ने पुणे अ संघाकडून खेळताना उपांत्य फेरीत रायगड जिल्ह्याच्या होली क्रॉस या संघावर ६-० असा विजय मिळवला. या स्पर्धेत रूद्वेक तळपे या खेळाडूने चार गोल केले. आर्य घोलप याने सतरा वर्षाखालील गटात उपांत्य फेरीमध्ये ठाणे संघाविरुद्ध तीन गोल, तर अंतिम सामन्यात मुंबई संघाविरुद्ध तीन गोल केले. लांडेवाडी शाळेचे प्रशासन तसेच मुख्याध्यापिका शबनम मोमीन, संभाजी काळे रोहित कुमार तसेच प्रशांत बेलवटे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *