गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार- २०१९ अविनाश एकनाथ दौंड यांना जाहीर.

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०७ मार्च २०२२

घोडेगाव


महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दिला जाणारा व कामगार क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारांच्या प्रस्तावाला कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतीच मंजुरी दिली असून राज्यातील ५१ गुणवंत कामगार/ कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी जाहीर केली. आंबेगाव तालुक्यातील गोनवडीचे सुपुत्र व शासकीय मुद्रणालय, मुंबई येथे लिपिक म्हणून आपली कारकीर्द सुरू केलेले अविनाश दौंड यांनी शासकीय मुद्रणालय लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे प्रदिर्घ काळ नेतृत्व केले आहे.

शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे संस्थापक स्वर्गीय र.ग.कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन कौशल्याचे धडे गिरवलेले दौंड आता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सचिव आणि महत्त्वाचे नेते म्हणून राज्य भरात ओळखले जातात. याशिवाय ते अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून देखील कार्यरत आहेत. ते मार्च २०२१ मध्ये शासकीय मुद्रणालयाच्या सेवेतून निवृत्त झाले असले तरी या शासकीय कर्मचार्यांचे वेगवेगळ्या व्यासपीठावर धडाडीने प्रश्न मांडून अतिशय खंबीरपणे नेतृत्व करत आहेत. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने शासकीय कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *