शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचल्या पाहिजे – गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील

अतुल परदेशी
मुख्य संपादक
१२ फेब्रुवारी २०२२

मंचर


राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत वय ६० वर्षावरील नागरिकांसाठी मोफत साह्यक साधने वाटप शिबीर नियोजन बैठकीचे आयोजन मंचर येथे राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र संचालिका पुर्वा वळसे पाटील आंबेगांव राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आयोजन केले होते.

कोरोना संपला नाही,कमी झाला आहे तरी शासन नियमांचे पालन करा – गृहमंत्री

केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या गोरगरीब जनतेसाठी लाभार्थ्यांसाठी खूप काही योजना असतात मात्र त्या योजना तळागाळातील जनते पर्यंत पोहचत नाही यासाठी आज पुर्वा वळसे पाटील यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत वय ६० वर्षावरील नागरिकांसाठी मोफत सहायक साधने वाटप शिबीर नियोजन बैठकीचे आयोजन करून 10 मार्च पर्यंत 20 हजार वंचित बांधवा त्यांच्या हक्काच्या शासन योजना पोहचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे त्याला तालुक्यातील सर्व संस्था जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य कार्यकर्ते यांनी सहकार्य करावे त्यासाठी लागणारे कम्प्युटर गाड्या यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल यासाठी शाळा आणि मोकळा आणि स्वच्छ परिसर याठिकाणी लाभार्थी यांची नाव नोंदणी करून त्यांना नाष्टा आणि जेवन देऊन कार्यकर्त्यांनी अधिकाधिक नाव नोंदणी करून घ्यावी अशा सुचना गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी नियोजन बैठकीत दिले.

राष्ट्रीय ग्रामीण विकास योजना केंद्र संचालिका पुर्वा वळसे पाटील यांनी प्रास्ताविक करत राष्ट्रीय वयोश्री योजना वय ६० वर्षावरील नागरिकांसाठी मोफत साह्यक साधने वाटप याची माहीती देत खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगांव तालुक्यातील गरजू लाभार्थी यांच्या पर्यंत पोहचून किमान विस हजार लोकाना शासनाच्या योजनाचा लाभ व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.

शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा यांनी पुर्वा वळसे पाटील यांनी आयोजित केलेल्या या आयोजन बैठकीचे कौतुक करत समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपत पुर्वा वळसे पाटील करत असलेल्याकामामुळे निश्चित गरजू घटकांना शासन योजनांचा लाभ मिळेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाचे चेअरमन विष्णु काका हिंगे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवत्व निकम जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील पंचायत समिती माजी सभापती वसंतराव भालेराव आंबेगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष बाळासाहेब बानखाले भीमाशंकर कारखाना उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सुषमा शिंदे जिल्हा परिषद सदस्या रूपाली जगदाळे पंचायत समिती सभापती संजय गवारे आदि उपस्थित…


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *