पुणे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय व अन्य उद्योगधंदे संध्याकाळी 11 वाजेपर्यंत चालू ठेवावे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम कडक करावे.- गजानन बाबर माजी खासदार मावळ…

रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहरातील व्यापाऱ्यांच्या , छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या , किरकोळ विक्रेत्यांच्या ,हॉटेल चालकांच्या वतीने आपणास विनंती करू इच्छितो की, आपण वास्तविकता जर पाहिली तर निश्चितपणे पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत ही वस्तुस्थिती आहे , परंतु त्यामुळे हॉटेल व्यवसाय संध्याकाळी 8 पासून सकाळी 7 पर्यंत बंद ठेवणे , तसेच इतर छोट्या-मोठ्या उद्योगांनाही उपरोक्त कालावधीमध्ये परवानगी नाकारणे हे योग्य ठरणार नाही. असे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार
यांना दिले.
हॉटेल व्यावसायिकांचा खरा व्यवसाय हा संध्याकाळी 8 वाजल्यापासून चालू होतो, आणि जर आपण 8 वाजता त्यांना हॉटेल बंद करण्यास सांगितले, तर त्यांच्या सहित त्यांच्या हॉटेलमध्ये कामावर असणारे कामगार यांच्यावरही त्याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होईल तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र हे औद्योगिक क्षेत्र असल्याने असंघटित कामगार लाखोंच्या संख्येने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये वास्तव्याला आहेत त्यांना संध्याकाळी जेवण हॉटेलमध्ये करावे लागते व जर आपण बंद केले तर त्यांना एक टाइमचे जेवण हि मिळणार नाही तसेच धंदाच नसल्यामुळे हॉटेलमध्ये कामावर असणारे कामगार यांच्यावरही आर्थिक कुर्हाड कोसळेल याची जाणीव या पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री या नात्याने आपण करावी ही मी आपणास नम्र विनंती करतो.
हॉटेल व्यवसायिक हे एक्साईज कर भरतात, एक्साईज ड्युटी कर स्वरूपात राज्याला मिळते व यातून राज्याचा विकास व्हायला मदत होते जर हॉटेल चालकांचे जर व्यवसायात चालले नाहीत तर ते एक्साईज कर कुठून भरणार याचाही आपण विचार केला गेला पाहिजे तसेच माननीय मंत्री महोदय या हॉटेल बरोबरच छोटे-मोठे अन्य उद्योग उदाहरणार्थ भाजीपाला व्यवसाय असेल किरकोळ विक्रेते असतील यांचाही