नारायणगाव महाविद्यालयात “वाणिज्य शाखेमधील संधी” या विषयावर व्याख्यान उत्साहात

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०६ मे २०२२

 नारायणगाव


नारायणगाव (ता. जुन्नर) येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभाग व वाणिज्य संशोधन केंद्र आयोजित कॉमर्स अँड अकाउंटन्सी असोसिएशन च्या वतीने वाणिज्य शाखेतील संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे असोसिएट डीन डॉ. यशोधन मिठारे तसेच सेंट विन्सेन्ट कॉलेज ऑफ कॉमर्स चे प्राचार्य डॉ. अनिल अडसूळे उपस्थित होते.

डॉ. यशोधन मिठारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वाणिज्य ही सर्वात विकसित शाखा आहे. तसेच परंपरागत नोकरी किंवा व्यवसाय न करता सतत नवीन संधी शोधत रहा, तरच तुमचा विकास जलदगतीने होईल. तसेच त्यांनी सध्या स्टार्ट अप चा जमाना आहे हे सांगताना ओला, उबर ह्या कपंन्यांची उदाहरणे देऊन मुलांना जागृत राहण्याविषयीं सल्ला दिला.

वाणिज्य विभाग, वाणिज्य संशोधन केंद्र आयोजित कॉमर्स अँड अकाउंटन्सी असोसिएशन चा उपक्रम

तसेच प्रा. डॉ. अनिल अडसूळे यांनी विद्यार्थ्यांना जीवनाचे ध्येय गाठताना सतत आंनदी असणे गरजेचे आहे. त्यांनी अब्राहम लिंकन यांचे उदाहरण देऊन जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन सांगितला. या कार्यक्रमाचे प्रास्तविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा डॉ. शिवाजी टाकळकर यांनी केले, तर वाणिज्य संशोधन केंद्र प्रमुख प्रा डॉ. जनार्दन भोसले यांनी पाहुण्यांचा परिचय स्वागत व सत्कार केला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे, तसेच एस. एम. बी. एस. टी. कॉलेज चे डॉ. डी डी. पवार, डॉ. प्रशांत साळवे, डॉ संजय शिंदे तसेच अर्थशास्त्र विभागातील प्रा. आकाश कांबळे, वाणिज्य विभागातील डॉ. आबा जगदाळे, प्रा वैशाली मोढवे, डॉ. सारिका जगदाळे, प्रा. सविता खरात, प्रा पूर्वा साने, प्रा. गौरी शेटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले तर प्रा. डॉ. मधुरा काळभोर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. अनुराधा घुमटकर यांनी आभार मानले. ह्या कार्यकमासाठी वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *