पिंपरी चिंचवड चे आयुक्त राजेश पाटील यांचे महत्वपूर्ण आदेश..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी;- दि ११ एप्रिल
फोन वाजला आणि उचलला की एकच मागणी मला रेमडिसिव्हीर इंजेक्शन हवे आहे . सध्या या इंजेक्शनची एव्हडा तुटवडा आहे आणि बाहेर काळाबाजार पण सुरू आहे. त्यावर उपाय म्हणून आयुक्तांनी कडक आदेश काढले आहेत. काय आहेत हे आदेश पहा.रेमडेसीव्हीर इंजेक्शन ची जबाबदारी संबंधित रुग्णालयांची


• कोविड रुग्णाला औषधे रुग्णालयाने उपलब्ध करावी, नातेवाईकांना बाहेरुन घेउन येण्यास सांगू नये
• औषधांची किंमत शासनमान्य दरानेच आकारावी.


• कोविड रुग्णांचा अंदाज घेउन आवश्यक साठा करावा त्याची रीतसर नोंद करावी
• औषधांचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी.