कोरोना आजाराने दगावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबासाठी देवदूत बनले दिनेश यादव!!

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०३ फेब्रुवारी २०२२

चिखली


कोरोना आजाराने जग हैराण झाले असताना अनेकांनी आपल्या कुटुंबाच्या सदस्यांना गमावल्याच्या अनेक घटना सगळीकडे घडल्या आहेत.या दुर्दैवी घटनेचा धक्का बसलेल्या कुटुंबाला सावरायला जर कुणी मदतीचा हात पुढे केला तर अशा व्यक्तीची किंमत देवदुतापेक्षा कमी नसावी.चिखली – कुदळवाडी भागातील सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या अशा एका कुटुंबाला आपल्या घरातील महिलेला गमावण्याची वेळ आली.मनपा स्वीकृत प्रभाग सदस्य दिनेश यादव यांना सदर बाब समजल्यावर त्यांनी तत्काळ, सदर कुटुंबातील व्यक्तींशी संपर्क साधून,शासनदरबारी पाठपुरावा करत त्यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत एका महिन्यात मिळवून दिली.पैसे बँक खात्यात जमा झाल्यावर,सदर महिलेच्या पतीने दिनेश यादव यांची भेट घेत,आजच्या काळातही अशा निरपेक्ष भावनेने काम करत असलेल्या व्यक्ती समाजात आहेत,हे बघून त्यांची पाणावलेल्या डोळ्यांनी यादव यांचे आभार मानले.

मिळवून दिली ५० हजाराची मदत!!!

शेवबाई रोकडे या महिलेचे कोरोना झाल्याने दुःखद निधन झाले होते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी अशा वेळी उभे राहणे आपले कर्तव्य आहे,या भावनेने दिनेश यादव त्यांच्या दुःखात सामील झाले.परंतु त्यांना शासन मदत तातडीने कशी देता येईल,याचा विचार करत त्यांनी त्यांचे पती काळूराम रोकडे यांच्याकडून सर्व माहिती घेत कागदोपत्री पूर्तता करून घेतली.शासनाच्या ज्या विभागात आर्थिक मदत देण्याचे प्रावधान आहे,त्यांच्याशी संपर्क साधून आमदार महेशदादा लांडगे यांच्यामार्फत पाठपुरावा करत रोकडे यांच्या परिवाराला तातडीने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करून घेतली.एक महिन्याच्या आत सगळी प्रक्रिया पूर्ण करून सदर रक्कम रोकडे यांच्या खात्यात जमा झाल्यावर त्यांनी दिनेश यादव यांना भेटून डोळ्यात पाणी आणत त्यांचे आभार मानले.जगातून माणुसकी अजूनही गेलेली नाही आणि साक्षात देवदुत बनून दिनेश यादव यांनी केलेल्या मदतीची चर्चा संपूर्ण प्रभागात आहे,ज्यावेळी स्वार्थाने सगळे बरबटलेले आहेत,अशा वेळी यादव यांच्यासारखी माणसे समाजाची शान आहेत अशी चर्चा प्रभागात आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *