खुनातील आरोपीला काही तासातच आळेफाटा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
०३ फेब्रुवारी २०२२

जुन्नर


रानमळा ( ता जुन्नर) येथे एका चाळीस वर्षीय महिलेचा तिच्या प्रियकराने खून केला असल्याची धक्कादायक घटना बुधवारी ( दि २) घडली आहे. सगुणा गोरक्ष केदार ( वय ४० वर्ष) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर या प्रकरणी तिचा प्रियकर संतोष बबन मधे सध्या राहणार रानमळा व मुळ गाव केळेवाडी (ता.संगमनेर ) जि.अहमदनगर यास अटक करण्यात आली आहे.याबाबत आळेफाटा पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार सगुणा गोरक्ष केदार (वय ४० सध्या रहाणार रानमळा ता.जुन्नर व मुळ गाव मांडवळ वासुंदे ता.पारनेर जि.अहमदनगर) आणि संतोष बबन मधे सध्या राहणार रानमळा व मुळ गाव केळेवाडी (ता.संगमनेर ) जि.अहमदनगर या दोघांत अनैतिक संबध असल्याने ते दोघे एकत्र रहात होते संतोष हा सगुणा हिस दारु पिऊन वारंवार मारहाण करत होता. त्यामुळे त्याच्या समवेत ती राहणार नाही हे त्याला समजले असता संतोष याने गावच्या हद्दीत असलेले राकेश सुदाम डोळस यांच्या शेताच्या कडेला रहात असलेल्या कोपीत सगुणा हिच्या डोक्याला जबर मारहाण करत खुन करून संतोष हा पसार झाला याबाबतची फिर्याद सगुणा हिचे वडील भाऊसाहेब रखमा दुधवडे सध्या राहणार रानमळा व मुळ गाव पळशी (ता.पारनेर)जि.अहमदनगर यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिली या फिर्यादीवरून आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी आरोपीला शोधण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून आरोपीला शोधण्यासाठी ठिकठिकाणी रवाना करण्यात आली होती.

या आरोपीला बेल्हे परीसरातुन एक तासात पकडल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खुण केल्याची कबुली दिली असुन सदर आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे. सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिसनिरीक्षक सुनील बडगुजर, राजेंद्र पवार ,रघुनाथ शिंदे,रागीणी कराळे,अंकलेश्वर भोसले,विकास गोसावी, भिमा लोंढे,अमीत पोळ,महेश काठमोरे,मोहन आनंदगावकर,सचिन रहाने,गोरक्ष हासे,समाधान अहीवळे यांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक राजेंद्र पवार करत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *