ओडिशातील बालासोर येथे एक मोठा रेल्वे अपघात, अपघातात आतापर्यंत २८८ लोकांचा मृत्यू झाला

ओडिशातील बालासोर येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत 288 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 900 हुन अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम संयुक्तपणे बचावकार्य करत आहे.
शुक्रवारी 2 मे रोजी सायंकाळी हा रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली. मात्र, आता ओदिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी या अपघाताबाबत मोठी माहिती दिली आहे. या अपघातात एकूण 3 गाड्यांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोरोमंडल एक्सप्रेसच्या 7 बोगींचं नुकसान झालं आहे. त्यामुळे मृतांचा आकडा अज्जुन वाढण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलं

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या इतर प्रवाशांना सोरो सीएचसी, गोपाळपूर सीएचसी आणि खंटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय 32 जणांची एनडीआरएफ टीम बचावासाठी पाठवण्यात आली आहे.
लोकांना नेण्यासाठी सुमारे 50 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, परंतु जखमींची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी बसेसची सोय करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *