रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय शहिदखान पठाण, यांची ८५ वी जयंती न्यू इंग्लिश स्कुल शिरूर येथे संपन्न

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
०३ फेब्रुवारी २०२२

शिरूर


रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष व शिरूरचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय शहीदखान पठाण यांचा ८५ वा जयंती सोहळा कार्यक्रम, न्यू इंग्लिश स्कूल, शिरूर येथे सोमवार दिनांक ३१ जानेवारी २०२२ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जाकीरखान पठाण हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव घावटे, निलेश खाबिया, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य डॉ राहुल घावटे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सी पी बोरा, अविनाश मल्लाव, आदेश बोरा, चोथमल कोठारी, भापकर, प्राचार्य संजय चौधरी, उपप्राचार्या अस्मिता डोंगरे, तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. जयंती सोहळ्याच्या औचित्याने राकेश शहा यांनी २०० पुस्तके विद्यालयास भेट दिली. आमदार रोहित पवार यांच्या वतीनेही शालोपयोगी साहित्य भेट देण्यात आली. चोथमल कोठारी यांनी सॅनिटायझर भेट दिली. सरीता मापन केंद्र शिरूर, यांनीही विज्ञान शाखेसाठी प्रयोगाचे साहित्य भेट दिले.

सदर विद्यालयास बहुउद्देशीय हॉलचे काम मंजूर झाले आहे. या कामासाठी देणगी म्हणून संपूर्ण खडी आणि वाळू भेट देण्याचे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव घावटे यांनी जाहीर केले. या प्रसंगी जाकीरखान पठाण, नामदेव घावटे, डॉ राहुल घावटे, सी पी बोरा, उपप्राचार्या अस्मिता डोंगरे, उपशिक्षिका नूतन पठारे आदी मान्यवरांची भाषणे झाली. तर उपशिक्षक एन टी गायकवाड यांनी स्वरचित कवितेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षिका कमल थिटे यांनी मांडले. सूत्रसंचालन आर बी रोहिले यांनी केले. तर आभार विद्यालयाचे प्राचार्य संजय चौधरी यांनी मानले.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *