जखमी बिबट्याला वनविभागाच्या सतर्कतेमुळे मिळाले जिवदान

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
३१ जानेवारी २०२२

खामुंडी


खामुंडी(ता. जुन्नर) येथील खामुंडी ते बदगी बेलापूर रस्त्याच्या परीसरातील रवींद्र डोंगरे या शेतकऱ्याच्या शेत जमिनी जवळ असणाऱ्या खोल ओढ्यात अंदाजे आठ ते नऊ महिने वयाची बिबट्याची मादी जखमी अवस्थेत असल्याची माहिती त्यांचा मुलगा सागर डोंगरे यांनी पत्रकार कैलास बोडके यांना दिल्या नंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन खात्री करून सदर घटनेची माहिती ओतूर वनविभागाचे वनरक्षक अतुल वाघुले यांना संपर्क करून दिल्या नंतर जुन्नर वनविभागाचे उप वनसंरक्षक अभिषेक भिसे व ओतूर वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांच्या मार्गदर्शना खाली वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक किसन केदार,पि. के खोकले, कि.एफ. खरोडे यांनी घटना स्थळी धाव घेऊन खोल ओढ्यातील झाडाझुडपात पडलेल्या जखमी बिबट्याच्या मादीला रेस्कू करून ताब्यात घेतल्यावर पुढील उपचारासाठी माणिक डोह बिबट निवारण केंद्रात पाठविले असून डॉ. निखिल बनगर हे जखमी बिबट्याच्या मादीवर उपचार करत असल्याची माहिती सुधाकर गिते यांनी दिली आहे.

दरम्यान ही बिबट्याची मादी भक्षाच्या शोधात रात्रीच्या वेळी खोल ओढ्यात पडली असून जखमी झाली असल्याची शक्यता देखील वनविभागाने वर्तवली आहे.विशेष म्हणजे या बिबट्याची मादी ज्या ठिकाणी जखमी होऊन ओढ्यात पडली होती त्याच अगदीच काहीशा अंतरावर मेंढपाळ आपल्या मेंढरांसह वास्तव्यास असल्याने ते भयभीत झाले होते मात्र या बिबट्याच्या मादीला वनविभागाने ताब्यात घेतल्याने त्यांनी सुटकेचा नि :श्वास सोडला आहे.या खोल ओढ्यातील झाडा झूडपात पडलेल्या जखमी बिबट्याच्या मादीला वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सतर्कते मुळे जीवदान मिळाल्याची बातमी परिसरात पसरताच परिसरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *