राजुरीत ड्रोन मशिनद्वारे केली सोयाबीनची फवारणी

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२८ जुलै २०२२

आळेफाटा


राजुरी (ता.जुन्नर) या गावात मंगळवार (दि.२६) पहिल्यांदाच ड्रोन मशिनद्वारे सोयाबीन पिकाला तन नाशकची फवारणी करण्यात आली. ग्रामीण भागातील शेतक-यांचा सध्या आधुनिक पध्दतीने शेती करण्याकडे कल वाढलेला दिसुन येत आहे. पुर्वी शेतकरी बैलांच्या मार्फत शेतीची मशागत करत असे त्यांची जागा टॅक्टर ने घेतलेली असुन दरम्यान पेट्रोल पंपाने फवारणी केली असता एका एकरला  बाराशे ते तेराशे रूपये खर्च येतो तर यामध्ये वेळ व औषधेही खुप जातात. परंतु ड्रोन मशिनद्वारे तणनाशक फवारणी केली असता एकरी फक्त आठशे रूपये घेतात तर तिन एकर क्षेत्र असले तर त्याचे एक हजार रूपये घेतले जात आहे. तसेच या ड्रोन द्वारे सोयाबिन,बाजरी,मूग,उडीद,गहु,हरभरा,तुर तसेच ऊस मका व सर्व प्रकारच्या पिकांना फवारणी करता येत आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्याने आधुनिकतेकडे वळून शेती करण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.

इस्राईल देशातून आणले १५ लाख रुपयांचे फवारणी ड्रोन मशीन

“सध्या आधुनिक पध्दतीने शेती करण्याचा शेतक-यांचा कल वाढलेला असुन पंपाने औषधे मारण्यास वेळ औषधे रूपये देखील जास्त प्रमाणात जाते परंतु ड्रोन मशिन द्वारे औषधे मारल्यास बचत मोठ्या प्रमाणावर होते. भापकर यांणी हे मशिन इस्राईल या देशातून मागवली असुन पंधरा लाख रूपये त्याची किंमत असुन बॅटरी वर ते चालत असुन दहा लिटर पाणी बसेल इतकी त्याची क्षमता आहे”.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *